कोल्हापूर

सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा

निवास चौगले

कोल्हापूर : केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने "गोकुळ' चे 2 मे रोजी होणाऱ्या मतदानातील अडथळाही दूर झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सत्तारूढ गटाला जबर धक्का बसला आहे.

"गोकुळ' च्या निवडणुकीला स्थगिती मिळावी म्हणून दोन संस्थांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या सोमवारी (ता. 19) रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य शासनाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही सुनावणी काल (ता. 26) रोजी सुनावणी होती, तथापि सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे निधन झाल्याने ही सुनावणी रद्द करून ती आज ठेवण्यात आली होती.

आज सकाळी न्यायमुर्ती उदय ललित व ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अर्ध्या तासांच्या युक्तीवादानंतर खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती न देताना मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश देत ही याचिका निकालात काढली. आजच निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या निवडणुकीसाठी 12 तालुक्‍यात 35 मतदान केंदे जाहीर केली होते. आता यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणखी 35 केंद्रांची वाढ करावी लागणार आहे.

ही निवडणूक पुढे जावी यासाठी सत्तारूढ गटाचे प्रयत्न सुरू होते तर विरोधकांनी मात्र ही निवडणूक आताच व्हावी यासाठी तयारी ठेवली होती. अखेर न्यायालयीन लढाईत सत्तारूढ गटाला पराभव स्विकारावा लागल्याने विरोधकांची बाजू भक्कम झाल्याचे बोलले जाते. 2 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

Junnar Road Crash: डिंगोरे येथे एसटी बस–दुचाकी भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

SCROLL FOR NEXT