gokul election kolhapur for three seats PN patil proposal candidate 
कोल्हापूर

गोकुळ निवडणूक रणांगण; पी. एन. यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, बैठकीत अनेक गोष्टी खासगी असल्याने त्या जाहीर करणार नाही, असेही स्पष्ट केले. पत्रकात म्हटले आहे. ‘गोकुळ’सह सर्व संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात, हा हेतू आहे. यामध्ये संघर्ष झाला तर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, या भावनेतून एकत्र येण्याच्या माझ्या विनंतीस मान देऊन आमदार पी. एन. यांनी प्रतिसाद दिला.

रविवारी जिल्हा बॅंकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये पाटील यांनी स्पष्टपणे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे चारच उमेदवार घेण्याची इच्छा असून ती आम्ही बदलणार नाही, असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, कागलमध्ये तुम्हाला घेऊ व माजी आमदार के. पी. पाटील यांना एक जागा देऊ. यावर मी पालकमंत्र्यांचा विषय काढला. त्यावर त्यांनी एखादी जागा त्यांना देऊ, असे सांगितले.

या बैठकीनंतर मी शांतिनिकेतन स्कूलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी आपण यामध्ये येणार नाही. तुम्ही कोणाबरोबर जावयाचे तो निर्णय घ्या, असे सांगितले. ‘गोकुळ’च्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची मते मिळाली नाहीत, असा आरोप होतो. पालकमंत्री पाटील यांना घेऊनच निर्णय घ्यावा लागेल, असेही मी पी. एन. यांच्यासमोर स्पष्ट केल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

मैत्रीत अडचण नको

बैठकीच्या दालनात आमदार पी. एन. पाटील यांचे सहकारी शिवाजी कवठेकर व सदानंद पाटील (गडहिंग्लज) यांना आम्ही दोघे एकत्र यावे, ही भावना आहे. त्यांच्यापुढे पाटील यांचा प्रस्ताव मी जसाच्या तसा सांगितला. चांगल्या भावनेने दोघांनी चर्चा केली होती. आमच्या मैत्रीत अडचण येण्याचे काहीच कारण नाही, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT