Municipal councillors actively campaigning across different talukas ahead of the Gokul Milk Union election.

 

esakal

कोल्हापूर

Gokul Election: महापालिकेचे नगरसेवक गोकुळच्या प्रचारात; वेगवेगळ्या तालुक्यांची जबाबदारी; प्रत्येकी ठरावधारक दिले वाटून

Gokul Election, Municipal Councillors, Campaign; गोकुळ निवडणुकीच्या प्रचारासाठी महापालिकेतील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना वेगवेगळ्या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

उदयसिंग पाटील

कोल्हापूर : महायुती, महाविकास आघाडीतील लढतीमुळे ‘गोकुळ’चे रणांगण तापण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारासाठी ताकद लावली जात आहे. महापालिकेतील दोन्ही आघाड्यांकडील नगरसेवकांना वेगवेगळ्या तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.

प्रत्येकाला ठरावधारक वाटून दिले आहेत. त्यातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दररोजचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ नेत्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. गोकुळ निवडणुकीतील घडामोडी वेगावल्या आहेत. सत्ताधारी, विरोधक आमनेसामने ठाकले असून जागांची निश्‍चिती केली जात आहे.

या निवडणुकीत ठरावधारक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे तालुकानिहाय मतदान असून ते फिक्स करण्याची जबाबदारी असते. प्रत्येक नेत्याचे ठरलेले मतदान म्हणजेच ठरावधारक आहेत; पण निवडणुकीत कधीच गाफील राहायचे नाही, हे दोन्ही बाजूंनी पक्के केले आहे. त्यासाठी प्रत्येक नेत्याचे त्या-त्या तालुक्यातील स्थानिक नेते, कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते. त्याचबरोबर सोबतीला यंत्रणा दिली जात आहे.

त्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका अशा यंत्रणेतील सदस्यांवर जबाबदारी दिली आहे. महापालिकेतील महायुतीतील भाजपचे तसेच महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या नगरसेवकांना तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. त्यात महत्त्वाचे पदाधिकारी, नगरसेवक सहभागी असून काही नगरसेविकेंचे पती, वडील अशांनाही त्यांच्या संबंधित तालुक्यात नेमले आहे. गेल्या आठवड्यापासून नेत्यांबरोबर फिरती, मेळाव्यांत सोबत आहेत.

आता तालुक्यातील ठरावधारकांपैकी काहींची जबाबदारी नगरसेवक व अन्य सदस्यांवर दिली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून अडचणी, काय हवे-नको, कुठे दुरुस्त करायला लागते, त्यासाठी काय पाहिजे याची चर्चा करून ‘ग्राउंड रिपोर्ट’ ज्या-त्या दिवशी नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. एका ग्रुपला काही ठरावधारक नेमून दिले आहेत. निवडणुकीपर्यंत त्यांच्या संपर्कात राहण्याची व ते कायम सोबत राहण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांना ग्रुपमधील काहीजण आज भेटून आले की काही जण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी भेटून येत आहेत. ‘भाव’ वधारण्यास सुरुवात

काही तालुक्यात ठरावधारकांची संख्या जास्त असून ‘फिल्डिंग’ लावण्यायोग्य ठरावधारकांवर जास्त लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी या यंत्रणेची मोठी मदत होणार आहे. दोन्हीकडील कार्यकर्ते येणार म्हटल्यावर त्यांचा ‘भाव’ वधारण्यास सुरुवात झाली आहे. दोघांनाही ‘मी तुमचाच’ सांगणारे काही ठरावधारक दिसून येत आहेत. आपल्या गोटातील असल्यास अशांसाठी योग्य ‘नजर’ ठेवली जात असून विरोधकांमधील काहींसाठी जाळे टाकले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

उल्हासनगरच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत! महायुतीतील धुसफूस पुन्हा उघड; भाजप नगरसेवकाची कमलेश निकम यांच्यावर टीका

'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT