लसीकरण
लसीकरण sakal
कोल्हापूर

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘गोकुळ’मार्फत जनावरांना लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘गोकुळ’मार्फत जनावरांना मोफत लसीकरण करणार आहे. यासाठी ‘गोकुळ’ १ लाख डोस खरेदी करत आहे. यापैकी उद्या ५० हजार डोस मिळणार आहेत. संघाच्या सर्व पशुवैद्यकीय  केंद्रांवर लसीकरणाची सुविधा असून, लसपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘जनावरांना लम्पी स्कीन आजारापासून दूर ठेवण्यासाठी ‘गोकुळ’ पुढाकार घेत आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे काही जनावरे बाधित आहेत. तेथील जनावरांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्य ठिकाणीही उपचार केले जाणार आहेत. हातकणंगले तालुका व इचलकरंजी परिसर वगळता जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव कमी आहे.’’

दरम्यान, ‘गोकुळ’ने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. एखाद्या गावात लम्पी स्कीनने बाधित जनावरे आढळली तर शेतकऱ्यांनी तत्काळ नजीकच्या ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून बाधित जनावरे अन्य जनावरांपासून वेगळी करावीत. गोठ्याची साफसफाई, स्वच्छता करावी. गोचीड व माशांचा बंदोबस्त करावा. बाधित जनावरांविषयी संघाकडे संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha election result 2024 : सभा घेतली, रोड शो केला.. तरीही मोदींचा करिष्मा चालला नाही; मुंबईतली गणितं कुठं चुकली?

Belgaum Lok Sabha Election Results : बेळगावात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टरांचा मोठा विजय; काँग्रेसच्या मृणाल हेबाळकरांचा पराभव

Thane Loksabha Result: शिंदे बालेकिल्ला राखणार? नरेश म्हस्केंना मिळाली मोठी आघाडी!

Kolhapur Constituency Lok Sabha Election Result: कोल्हापुरात जल्लोष सुरु... शाहू महाराज जवळपास फिक्स? संजय मंडलिकांची केली अडचण

India Lok Sabha Election Results Live : तब्बल दहा वर्षांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जल्लोष

SCROLL FOR NEXT