gokul organisation in kolhapur election of cooperative organisation from 15 february in kolhapur 
कोल्हापूर

गोकुळची प्रारुप यादी लवकरच होणार प्रसिद्ध ; जिल्हा बँकेची प्रकियाही सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासून  सुरू करण्याचे आदेश आज प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले. ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांची निवडणूक थांबलेली आहे, तिथून पुढे उर्वरित प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे ठराव संकलनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणुकीसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध होईल.

जिल्हा बँकेची ठराव प्रक्रिया पाच दिवस शिल्लक होती, तोपर्यंतच निवडणुकीला स्थगिती आल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. आता उर्वरित प्रक्रिया (सोमवार 15) फेब्रुवारीपासून सुरू होत असून पाच दिवसात उर्वरित संस्थांचे ठराव दाखल करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्याने निवडणुकीसाठीची तारीख बदलावी यासाठी काही संस्थानी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली, याबाबत प्राधिकरणाला निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राधिकरणाने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT