Gokul's Political Coverage About Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गोकुळच्या "हंडी'त राजकारणाचा "दहीकाला'

अजित माद्याळे

गडहिंग्लज : जिल्ह्यातील शिखर संस्थांपैकी एक जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीला हळूहळू धार येत आहे. गोकुळच्या सत्तेची "हंडी' मिळवण्यासाठी ठराव दाखल करण्याच्या मुदतीत सत्तारूढ आणि विरोधकांतील राजकारणाचा "दहीकाला' झाला असून ठराव दाखल करताना दोन्ही बाजूंच्या एकसंधतेला तडा गेल्याचे चित्र स्पष्ट झाले. बहुतांशी गटनेत्यानी आपापल्या वर्चस्वासाठी स्वतंत्रपणे ठराव दाखल करून "हम भी कुछ कम नही' हेच दाखवून दिले आहे. ठराव दाखल करतेवेळी सवतासुभा मांडलेले प्रत्यक्ष मैदानात कोणती भूमिका घेतात, याकडेही लक्ष आहे. 

गोकुळ निवडणुकीत विधानसभा निवडणुकीतील राजकारणाची किनार मिळणार हेही निश्‍चित आहे. सत्तारूढांच्या विरोधात महाविकास आघाडी तयार करण्याच्या हालचालींना वेग आला तरी ठराव दाखल करतेवेळी या आघाडीतील घटक असलेल्या काही गटनेत्यांनी स्वतंत्रपणे ठराव सादर करण्यात धन्यता मानली आहे. याशिवाय सत्तारूढ गटातील काही प्रमुखांनीही ठराव दाखल करण्यात सवतासुभा मांडला. स्वतंत्रपणे ठराव दाखल केलेल्या गटनेत्यांची भूमिका काय असेल हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे. योग्य वेळी पत्ते खुले करण्याचा या गटनेत्यांचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे सत्तारूढ आणि विरोधी नेते बुचकळ्यात पडल्याचे चित्र आहे. राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काही गटनेत्यांनी स्वतंत्रपणे ठराव सादर करण्यात धन्यता मानल्याचेही बोलले जाते. म्हणजेच हे सारे प्रयत्न गोकुळमध्ये प्रवेश मिळावा यासाठीच असल्याचेही सांगितले जाते. परंतु यामुळे भविष्यात पुन्हा राजकारणाची खिचडी होण्याचे संकेत मिळत आहेत. 

महाविकास आघाडी गोकुळ निवडणुकीतही कायम ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी त्याच्या मूर्तस्वरूपासाठी प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्‍यात गोकुळच्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. सत्तारूढ आणि विरोधी नेत्यांनाही ही डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत. गडहिंग्लज तालुक्‍याचेच उदाहरण घेतले तर सत्तारूढकडून माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी यांचे सुपुत्र सदानंद, गोडसाखर संचालक प्रकाश चव्हाण, विद्यमान संचालक रामराज कुपेकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधी आघाडीकडून जि. प. चे उपाध्यक्ष सतीश पाटील, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, बाळासाहेब कुपेकर, सोमगोंडा आरबोळे इच्छुक असल्याचे कळते. यातील प्रत्येक इच्छुकांनी आपापल्या कुवतीने ठराव नेत्यांपर्यंत पोहचवले आहेत. पाटील हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे तर श्री. गुरबे हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. कुपेकर यांनी गतवेळी विरोधी आघाडीतून नशीब आजमावले होते. जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी यांच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. यामुळे प्रत्यक्षात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे आता ज्या-त्या वेळच्या राजकीय घडामोडीवरच स्पष्ट होणार आहे. 

"टोकन मनी'ची स्ट्रॅटेजी 
गोकुळ निवडणुकीत मतदान करण्याचा ठराव आपल्याच बाजूच्या कार्यकर्त्याच्या नावे मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती. यासाठी दोन्ही बाजूंनी "टोकन मनी'ची स्ट्रॅटेजी अवलंबल्याची चर्चा आहे. एका बाजूच्या इच्छूकांनी 25 हजार तर दुसऱ्या बाजूने 10 हजाराचे "टोकन' ठरावधारकांच्या हातात दिल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतदानावेळी ही टोकन मनी कोणाच्या पारड्यात जाणार, हे आता निकालाची हंडी फुटल्यानंतरच समजणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मनसे नेते अविनाश जाधव यांची सुटका, आंदोलनात घेतला सहभाग

MNS Mira bhayandar Morcha: मराठी मोर्चाला पोलिसांचा अडथळा? गुजराती-मारवाडींची चिथावणी; मीरा-भाईंदरमध्ये काय घडलं?

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले मंत्री प्रताप सरनाईक?

Viral Video : पुढील कसोटीसाठी येण्याची तसदी घेऊ नकोस! Dinesh Karthik ने सर्वांसमोर रवी शास्त्रींची केली पोलखोल

अखेर अस्मिताला समजणार प्रियाचा खरा चेहरा; भावजयीवर चांगलीच भडकली , वाचा 'ठरलं तर मग' मध्ये पुढे काय होणार?

SCROLL FOR NEXT