gold price today kolhapur marathi news 
कोल्हापूर

Good News: आता करा सोने खरेदी; तोळ्याला आहे एवढा दर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या वर्षी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. कोरोनामुळे लग्नासह इतर समारंभांवर बंदी असली तरी सोन्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. ऐन दिवाळीत सोन्याचा दर प्रतितोळा ५७ ते ५८ हजार रुपये होता. भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर लग्नसराई आहे म्हणून किंवा नाही म्हणून ठरत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव किती आहे, त्यावर ठरतो. कोरोना काळात सर्वच क्षेत्रातील उलाढाल ठप्प असली तरी सट्टाबाजारात मात्र सोन्याचा बाजार तेजीत होता. 

 ऐन लग्न सराईत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून दिवाळीत ५७ ते ५८ हजार रुपये प्रतितोळा सोन्याचा दर आज ४७ ते ४८ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत घसरल्याचा परिणाम सोने दरावर झाल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. 

तीन महिन्यांत तोळ्याला १० हजारांनी घट

गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह प्रति तोळा दर ४८ हजार ३०० रूपये तर जीएसटीशिवाय तो ४७ हजार रूपये होता. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर उतरल्याने बाजारातील सोन्याची मागणीही वाढली आहे. त्यातच अलिकडेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कर (एक्‍साईज ड्युटी) कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचाही परिणाम दरावर झाला आहे. अजून पूर्ण कर माफी नाही; पण हळूहळू सवलत मिळत आहे. पूर्ण सवलत मिळाल्यानंतर सोन्याच्या दरात पुन्हा घसरण होण्याची शक्‍यता आहे. 

भारतातील सोन्याचा दर लग्नसराईवर ठरत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत किती यावर तो ठरतो. अलीकडे डॉलर घसरल्याचा परिणाम सोने दरावर झाला आहे. सोन्याची बाजारातील मागणीही चांगली आहे. त्यातच दर कमी झाल्यानेही सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. 
- भरत ओसवाल, सराफ व्यावसायिक

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

Viral Indian Wedding Funny Moment : या नवरदेवानं तर हद्दच केली! लग्नात 'चमकायच्या' नादात अंगालाच गुंडाळली लाईटिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Shani Gochar 2026: 21 मार्चपासून शनि नक्षत्र गोचर! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाईम

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Equestrian Statue: बीबीदारफळमध्ये मध्यरात्रीच उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; हटविण्यास ग्रामस्थांचा विरोध, पाेलिसांशी वादावादी!

SCROLL FOR NEXT