Golden Opportunity for Players: 20 more games for government jobs 
कोल्हापूर

खेळाडूंना सुवर्ण संधी ः सरकारी नोकरीसाठी आणखी 20 खेळ

सुयोग घाटगे

कोल्हापूर  : केंद्र शासनाने क वर्ग सेवाभरतीसाठी असणाऱ्या खेळांच्या यादीत नव्याने 20 खेळांचा समावेश केला. यामुळे विशेष प्रावीण्य असणाऱ्या खेळाडूंना नोकरीची हमी मिळाली आहे. केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाने याबाबत निर्देश जारी केले. 
केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खेळाला महत्त्व देत पहिले पाऊल टाकत क वर्ग पदभरतीसाठी 20 खेळांचा समावेश केला आहे. या खेळांमधून आंतरराष्ट्रीय अथवा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या खेळाडूला सरकारी नोकरीची दारे खुली केली आहेत. सुरवातीला 43 खेळ पात्र होते त्यात 20 खेळांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंच्याक सिलॅट, बेसबॉल, रग्बी, बास्केटबॉल, टग-ऑफ-वॉर, मल्लखांब, पॅरा स्पोर्टस (पॅरा ऑलिंपिक आणि पॅरा आशियाई स्पर्धा), डीफ स्पोर्टस्‌सह 20 खेळांचा समावेश केला आहे. 
कोल्हापूरमध्ये सध्या बेसबॉल, रग्बी, बास्केटबॉल, टग-ऑफ-वॉर यांसारख्या खेळामध्ये सर्वाधिक प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत. शिवाय मल्लखांब हा तर पारंपरिक खेळ आहे. पॅरा स्पोर्टस (पॅरा ऑलिपिंक आणि पॅरा आशियाई स्पर्धा) या क्रीडा प्रकाराचा विचार केल्यास यासाठीचे पात्र खेळाडू कोल्हापूरमध्ये आहेत. 

चौकट 
या 20 खेळांचा समावेश 
पिंच्याक सिलॅट, रग्बी, बेसबॉल, सायकलिंग, पोलो, डिफ स्पोर्टस, मल्लखांब, मोटार स्पोर्टस, नेटबॉल, शूटिंग बॉल, रोलबॉल, सेपाक तकरॉ, रस्सीखेच, वुशू, ट्रायलथॉन, तलवारबाजी, कुडो, सॉफ्टटेनिस, टेनपिंग बॉलिंग, पॅरास्पोर्टस. 

आधीचे 43 खेळ 
तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, आट्या-पाट्या, बॅडमिंटन, बॉल-बॅडमिंटन, बास्केटबॉल, बिलियर्डस अन्‌ स्नूकर, बॉक्‍सिंग, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, घोडेस्वारी, फुटबॉल, गोल्फ, जिमनॅस्टिक्‍स, हॅंडबॉल, हॉकी, आईस-स्कीईंग, आईस-हॉकी, आईस-स्केटिंग आणि ज्यूदो, कबड्डी, कराटे-डो, कयाकिंग आणि केनोईंग, खो-खो, पोलो, पॉवरलिफ्टिंग, रायफल नेमबाजी, रोलर स्केटिंग, नौकानयन, सॉफ्ट बॉल, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनी-कोईट, टेनिस, व्हॉलीबॉल, भारोत्तोलन, कुस्ती, याचिंग. 


केंद्राच्या निर्णयामुळे कोल्हापूरमधील रग्बीच्या विकासाला चालना मिळणार आहे. सध्या या पात्रतेत बसणारे अनेक रग्बी खेळाडू येथे आहेत. ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये दबदबा कायम राखला आहे. 
- दीपक पाटील, रग्बी प्रशिक्षक 

मल्लखांब हा संपूर्णतः भारतीय खेळ आहे. या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश नसल्यामुळे त्याच्याकडे ओढा कमी होता. मात्र नोकरीची हमी देणारा हा खेळ झाल्यामुळे ऑलिपिंकची दारे देखील लवकरच खुली होतील अशी आशा वाढली आहे. 
- विश्वास चोपडे, मल्लखांब प्रशिक्षक 

बेसबॉलसारख्या खेळामध्ये देशातील खेळाडूंचा सहभाग कमी आहे. असे असूनदेखील या खेळाचा समावेश होणे ही खेळाडूंना प्रेरित करणारी गोष्ट आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील बेसबॉलच्या विकासाला चालना मिळेल. 
- गिरीजा बोडेकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू 

पॅरास्पोर्टसचा यामध्ये समावेश झाल्याने खेळाडूंना न्याय मिळाला. अशा संधी उपलब्ध होण्याने खेळामध्ये घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळते. 
- स्वरूप उन्हाळकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू 

 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT