Good News: Kovid Center built by flat owners of Blue Bell Apartments in Kolhapur, Kelly 10 bed facility 
कोल्हापूर

गुड न्यूज ः कोल्हापुरात ब्लू बेल अपार्टमेंटच्या फ्लॅटधारकांनीच उभारले कोविड सेंटर, केली 10 बेडची सुविधा

डॅनिअल काळे


कोल्हापूर  : कोरोनाच्या विरोधातील लढाई अगदी-अगदी तळागाळापर्यंत नेली जात आहे. यासाठी कदमवाडीतील कारंडे मळा येथील ब्लू बेल अपार्टमेंटस्‌मधील क्‍लब हाउसच्या हॉलमध्ये कोविड सेंटरची उभारणी फ्लॅटधारकांनी स्वत: केली आहे, हे विशेष. 
कोरोना साथीचे रुग्ण कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शिवाय, बेडचा प्रश्‍नही उभा राहिला आहे. यासाठी अनेक खासगी हॉटेल्स, सभागृहात कोविड सेंटर उभी केली जात आहेत. सर्किट हाउसच्या मागील बाजूस कारंडे मळ्यात ब्लू बेल अपार्टमेंटस्‌ आहे. ब्लू बेलचा हा कॅम्पस असून, तीन इमारती आहेत. यातील एका इमारतीतील क्‍लब हाउसमध्ये फ्लॅटधारकांनी हे सेंटर उभे केले. दहा बेडचे हे कोविड सेंटर आहे. अपार्टमेंटमधील नागरिकांच्या पुढाकाराने सेंटर उभे केले. ऑक्‍सिजनच्या सुविधांसह हे सेंटर आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड सेंटर उभे केल्याने महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांना सदिच्छाही दिल्या. 
सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, शिवाजी विद्यापीठ, कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल अशा ठिकाणी अशी कोविड सेंटर उभी केली आहेत. येणाऱ्या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहून आणखी कोविड सेंटर उभी करावी लागतील. यासाठी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाने विविध ठिकाणच्या जागा, कार्यालये ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरू करण्यास सुरवात केली. ब्लू बेल अपार्टमेंटमध्ये दहा सुसज्ज अशा ऑक्‍सिजनसहित बेड असलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आता उपचार मिळणार आहेत. 
नगरसेवक सत्यजित कदम यांनी कोविड सेंटरला भेट दिली. याबरोबर उपजिल्हाधिकारी संपत खिलारे, डॉ. शिरीष पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक राजसिंह शेळके, अनिल पाटील, विक्रम पाटील, किशोर जंगम, दीपक मादनाईक, शिवाजी संकपाळ आदींसह नागरिक उपस्थित होते. 

"सकाळ'चे असेही बळ..! 
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णालयातील बेडस्‌ अपुरे पडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोठ्या सोसायट्या, अपार्टमेंटस्‌नी पुढाकार घ्यावा. त्यांच्या सोसायटीत कोणी कोरोनाबाधित आढळला तर त्याची सोय त्या सोसायटीत करावी, असा पर्याय "सकाळ' माध्यम समूहाने सुचविला आणि या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक सोसायट्या, अपार्टमेंटस्‌नी निर्णयही घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

INDW vs AUSW : भारतीय संघाला धक्का! मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार; पुण्याच्या खेळाडूला मिळाली संधी

Mumbai News: जिथे कबुतरखाने तिथे चिकन-मटण सेंटर! ‘आम्ही गिरगावकर’ संस्था आक्रमक

PCMC Traffic : खड्ड्यांपासून चालकांची सुटका; मात्र कोंडीचा धसका, रक्षक चौकातील रस्त्याचे डांबरीकरण; सकाळी-रात्री वाहतूक संथगतीने

Navratri Fasting Tips: नवरात्रात उपवास करताय? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

SCROLL FOR NEXT