Google four people beating to women in kolhapur 
कोल्हापूर

‘‘मला वाचवा, हे लोक मला ठार मारणार आहेत,’;महिलेचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

कळे - येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर महिलेला चौघांनी जोरदार मारहाण केली. संबंधित महिला वाचविण्यासाठी आक्रोश करत असता नागरिक जमले; पण नागरिकांनाही दमदाटी करत त्यांनी महिलेसह भरधाव चारचाकीतून कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले. सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर कळे येथील कळे धरण ते मरळी पूल दरम्यान असलेल्या एका सॉमिलसमोर मोटार थांबली. मोटारीत एक महिला आरडाओरडा करत होती. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून चौघेजण तिचे तोंड दाबून मारहाण करू लागले. 
दरम्यान, रस्त्याशेजारीच काही फडकरी चहा घेत होते. आवाज ऐकून चौकशी केली. त्यापैकी एका फडमालकाला त्यांनी ढकलून दिले. सर्वांना शिवीगाळ करून या वादात न पडण्यासाठी दमदाटीही केली. दरम्यान, ‘‘मला वाचवा, हे लोक मला ठार मारणार आहेत,’ असा आरडाओरडा संबंधित महिलेने केल्याने गर्दी वाढू लागली. दरम्यान, काहींनी कळे पोलिसांना कळविले. त्यामुळे महिलेला मोटारीत कोंबून सर्वांनी गर्दीतून वाट काढत कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले.

याबाबत कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्याशी संपर्क झाला नाही. कळे पोलिसांत संपर्क साधला असता, बिनतारी संदेशवरून कंट्रोलला कळविले व सर्व पोलिस ठाण्यांना घटनेबाबत अवगत केले. नाकाबंदीदरम्यान वाटेत जुना राजवाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घरगुती कारणातून ही घटना घडली असल्याचे समजले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

Amravati News: अमरावती जिल्ह्यात ९२ हजार सावकारी कर्जदार; १३० कोटींचे वितरण, २४ अवैध सावकारांविरुद्ध धाडी, दोघांविरुद्ध फौजदारी

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

SCROLL FOR NEXT