कोल्हापूर

गोपाळराव पत्रकार परिषद

CD

दौलतच्या जमिनीबाबतचा आरोप खोडसाळपणाचा
ःगोपाळराव पाटील ः मानसिंग खोराटे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० ः दौलत कारखान्याच्या जमिनीसंदर्भात अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केलेला आरोप खोडसाळपणाचे आहेत असे प्रत्युत्तर कारखान्याचे ज्येष्ट संचालक गोपाळराव पाटील यांनी दिले. कारखाना चालवायला घेतल्यापासून खोराटे सातत्याने विपर्यस्त विधाने करुन स्थानिक राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखाना चांगला चालवणे एवढेच त्यांचे काम आहे. त्यांनी ते व्यवस्थित करावे. इतर विषयात ढवळाढवळ करु नये असा इशाराही त्यांनी दिला. आज येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली.
खोराटे यांनी दोन दिवसापूर्वी कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात दौलत विश्वस्थ संस्थेच्या नावे चाळीस एकर जमिन हडप करण्याचा आरोप करुन आपण हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे सांगितले होते. त्यावर पाटील यांनी आज खुलासा केला. कारखान्याने 1983 साली विश्वस्थ संस्थेच्या नावे वीस एकर जमिन नव्यानव्व वर्षाच्या कराराने दिली आहे. त्या जागेत महाविद्यालय आहे. शासन आणि युजीसीच्या विविध योजना राबवताना ही जमिन संस्थेच्या नावे आवश्यक असते. त्यासाठी म्हणून 2011 साली झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मतानुसार ती संस्थेच्या नावे करण्याचे ठरले होते. त्यामध्ये हडप करण्याचा कोणताही हेतू सल्याचे स्पष्ट केले. कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! मान्सून २ दिवसात केरळात दाखल होणार, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिले अपडेट

Hidden Village: इतिहास बाहेर आला! महाराष्ट्रात 74 वर्षांपासून पाण्याखाली दडलेलं गाव अचानक समोर; पर्यटकांची झुंबड, Viral Video...

El Nino Impact : कोकणातील शेतकऱ्यांवर 'एल निनो'चे महाकाय संकट! आंबा-काजूनंतर आता खरीप हंगामही धोक्यात? कृषी विभागाने दिला इशारा

Chaloba Temple Ban : चंदगडमधील प्रसिद्ध चाळोबा देवस्थान परिसरात पर्यटकांवर बंदी; धार्मिक पावित्र्य अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Solapur Highway Accident: काम आटोपून घरी निघाले, पण परतलेच नाहीत; डंपरच्या धडकेत पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT