gopichand padalkar on tour of kolhapur district and udes plow farming in kolahpur 
कोल्हापूर

आमदार पडळकरांना आवरला नाही मोह, घेतला त्यांनी हातात औतच

रविंद्र पाटील

कबनूर (कोल्हापूर) : आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यातील कबनूर येथील शेतात औत हाकले. कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रे दरम्यान कबनूर गावातील शेतकरी अनिल बापू माळी यांच्या शेतात ऊसाची फोडणी (भरणी) करत असताना पडळकर यांनी त्यांच्या शेतात चक्क औत हाकले आहे. 

आपण शेतकरी कुटूंबातील आहोत. शेतीकाम हे आपल्याला नवीन नाही याची प्रचीती त्यांनी करुण दिली. आमदार पडळकर व माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे कृषी विधेयकाच्या समर्थनात किसान आत्मनिर्भर यात्रेनिमित्त गुरुवारी चंदूर (ता हातकणंगले) येथे सभेसाठी रात्री उशिरा आले होते. सभा झाल्यानंतर ते कबनूर येथे शिवनंदी सांस्कृतिक भवनमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. 

सकाळी ते कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रेसाठी निघाले असता भवनला लागूनच असलेल्या शेतात अनिल माळी हे औत हाकताना त्यांना दिसले. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना औत हाकण्याचा मोह झाला. आमदार पडळकर आणि माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्याला सांगून सुमारे अर्धा तास औत हाकण्याचे काम केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सुधीर पाटील, अनिल डाळ्या, सुधीर पाटील, बी. डी. पाटील, हिंमत जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.   

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT