कोल्हापूर

शासनाची परवानगी; पण  जलतरण तलाव कोरडेच 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : राज्य शासनाने जलतरण तलाव सुरू करण्याला मंजुरी दिली असूनही शहरातील बहुतांश तलाव बंदच आहेत. तलाव सुरू होतील, अशी शक्‍यता नसताना अनपेक्षित या निर्णयामुळे जलतरणपटू काही प्रमाणात समाधानी झाले असले तरीही तलाव सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. 

सात महिन्यांच्या लॉकडाउनमुळे राज्यभरातील जलतरण तलाव पोहण्यासाठी आणि सरावासाठी बंद केले होते. सध्या मात्र शासनाने तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे, मात्र अनेक महिन्यांपासून बंद असणारे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्याचा मेंटेनंस करण्यासाठी मात्र काही कालावधी जावा लागणार आहे. जलतरण तलाव योग्यप्रकारे कार्यान्वित ठेवण्यासाठी ही यंत्रणा सात महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने वापरली गेली आहे. शिवाय तलावातील पाणी हे शुद्धीकरण करून सोडले जाते व साठवणुकीची व्यवस्था स्वच्छ गरजेची आहे. 
शिवाय शासनाने तलाव सुरू करण्यासाठी परवानगी दिली असली तरीही नेमक्‍या सूचना मात्र दिल्या नसल्यामुळे तलावचालकांसमोर याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जलतरणप्रेमींना जलतरणाचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. 

शासनाने परवानगी दिली असली तरीही डागडुजी आणि पाण्याचे आरोग्यवर्धक प्रमाण नीट राखण्यासाठी थोड्या दिवसांचा कालावधी जावा लागणार आहे. शिवाय मार्गदर्शक सूचना ठरवूनच प्रवेश संख्या निश्‍चिती आणि वापरायला मिळणाऱ्या सुविधा या ठरवल्या जातील. 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

HSRP नंबरप्लेटची मुदत फक्त आज! किमान नोंदणी तरी करा, नाहीतर... दंडात्मक कारवाईसह १ जुलैनंतर तुमच्या गाडीची 'ही' कामे थांबणार

Latest Marathi News Live Update : शिंदेंची २ वाजता पत्रकार परिषद

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT