govind Pansare murder case Further hearing on August 21 
कोल्हापूर

पानसरे हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला पुढील सुनावणी ; संशयितांना जामीन मिळणार की नाही? 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येतील संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि भरत कुरणे या दोघांच्या जामीन अर्जावर आज सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद झाला. सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे हे प्रत्यक्षात हजर होते तर दुसरे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

युक्तीवादात अंदुरे आणि कुरणे यांचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येचा कट रचण्यामध्ये सहभाग आहे. त्यांना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाब येऊ शकतो, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या समोरही आज दुपारी ही सुनावणी झाली. दोन तासांहून अधिक काळ ही सुनावणी सुरू होती. पुढील सुनावणी 21 ऑगस्टला होणार आहे. 

ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयित समीर गायकवाड, विरेंद्रसिंह तावडे यांच्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील संशयित सारंग आकोळकर, विनय पवार या दोघांचाही अद्याप शोध सुरू आहे. दरम्यान, कारवाई केलेल्या संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यां दोघांनीही जामीन मिळावा यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. 

दरम्यान, आजपर्यंत अल्पवयीन साक्षीदारास धमकावणे, हत्येतील मोटारसायकल कोल्हापुरात आणणे, हत्येच्या कटात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होणे, बेळगावंच्या एस.टी.स्टॅण्डवर झालेल्या बैठकीला उपस्थित रहाणे, अशा अनेक ठिकाणी दोघांचा संबंध येत असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन मिळण्याचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी केली असल्याचे ऍड. शिवाजीराव राणे यांनी सांगितले. ऍड. निंबाळकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुण्यातून सुनावणी मध्ये सहभागी होऊन बाजू मांडल्याचेही ऍड.राणे यांनी सांगितले. 

संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT