gram panchayat election 2020 
कोल्हापूर

गावचं नाही..भावकीची चार मतं लई झाली ; बंडखोर, अपक्षांकडून अडवणूक सुरु 

सुनील पाटील

कोल्हापूर : मला गावचं नाही, भावकीचं तरी मतदान पडल नव्हं.. अस म्हणत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावा-गावातील गुडघ्याला भासिंग बांधलेले कार्यकर्ते फॉर्म भरण्याची तयारी करु लागले आहेत. कट्ट्यावर बसून कोण तर "पिन' मारायचा अवकाश "मी' सरपंच होणार म्हणूनच गावभर प्रचाराला सुरुवात करत आहेत. पक्षीय नसले तरीही गट-तट आणि भाऊबंदकीत होणारी या निवडणुकीमध्ये हेवे-दावे काढण्याची चांगली संधी काहीजणांना मिळत असते. ते याचा पूरपुर फायदा घेताना दिसत आहेत. 

मला शेतातून वाट देत नाही. ऊस तोडणी आल्यावर रस्त्यावर पाणी सोडतोय. एकमेकांमध्ये भांडण लावतोय. आता निवडणूक लढवतोय त्याला दाखवतोच म्हणून प्रत्येक गावात काहीजण इर्षेला पेटले आहेत. रस्ता अडवणारा, ऊस तोड आल्यावर मुद्दाम रस्त्यावर पाणी सोडणारा ज्या वार्डात उभा राहिल त्याच वार्डात आपणही फॉर्म भरुन त्याची अडवणूक करायची हा एकच अजेंडा घेवून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गावाचे राहू दे घरच्यांचे आणि भावकीचं मतदान पडले तरी लई झालं, अस म्हणत हे इच्छुक एक-दोन मित्रसोबत घेवून प्रचारासाठी घरं आणि घर पालथे घालत आहेत. 

गावागावात ज्या मोठ-मोठे गट-तट किंवा सहकार समूह आहेत. ते आपआपल्या पातळीवर पॅनेल करण्याच्या तयारीत आहेत. कोण उमेदवार असावा, तो निवडूण येईल का? एकाला उमेदवारी दिली तर दुसऱ्याची समजूत कशी काढायची? या सर्व पातळीवर नियोजन केले जात आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही पक्षीय पातळीपेक्षा गटतट आणि समूहाच्या पातळीवरच निवडणूक लढली जाणार आहे. ज्या ठिकाणी सरपंचपद खुल्या प्रवर्गातील आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये मोठी चुरस आहे. पण, एकाच वार्डामध्ये जे-जे बंडखोरी करणार किंवा अपक्ष निवडणूक लढविणार आहेत, त्यांची मनधरणी करण्यासाठी समूहाला किंवा मोठ्या गटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 


 
अपक्ष, बंडखोरांची होणार अडचण 
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष आणि बंडखोर उमेदवार समूहाची अडचण करु शकतात. त्यांना गावपातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवरील नेत्यांकडून समज देण्यासाठी यंत्रणा सक्षम केली जात आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT