gram panchayat election 2021 maharashtra 
कोल्हापूर

ग्रामपंचात पॅनेल बांधणीसाठी कसरत ; सहकार समूह, गटाची प्रतिष्ठापणाला 

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मनधरणी आणि समजूत काढताना दमछाक होत आहे. उद्या फॉर्म माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे. गावागावातील सहकारी सेवा संस्था, दूध संस्था, गावकारभाऱ्यांची घरे किंवा समाज मंदिरांमध्ये इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा करुन पॅनेल बांधणी केली जात आहे. एकाच गटात दोन-दोन पॅनेल नको, प्रश्‍न गटाचा आहे. भावकीचा आहे, असं म्हणत गावागावातील गावकारभारी इच्छुकांकडून गटाकडून किंवा संस्थेकडून उमेदवारी का द्यावी, याची विचारणा करुन उमेदवारांचे निवड करुन पॅनेल बांधणी करत आहेत. 

जिल्ह्यात 433 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. उद्या (4 जोनवारी) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघार घ्यायची वेळ आहे. त्यामुळे, रात्री उशीरापर्यंत कोण कोठून माघार घेणार, त्याचे नियोजन व पॅनेल बांधणीचे काम सुरु होते. ज्यांनी-ज्यांनी गावकारभाऱ्यांचे ऐकूण माघार घेतली त्यांचा त्याचवेळी सत्कार केला जात आहे. ज्यांनी माघार घेतली त्यांनीही जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, त्याचा जोमाने प्रचार करा अशा सूचनाही दिल्या जात आहे. ज्यांनी-ज्यांनी माघार घेण्याचे मान्य केले आहे. ते सर्व उद्या सामुदायिकरित्या माघार घेण्यासाठीच जाणार आहेत.

गावकारभारी, सहकार समूह किंवा गटाने जो निर्णय घेतला. तो प्रमाण मानून कामाला लागलावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे. जो समूहाच्या किंवा गटाविरूध्द जाईल त्या उमेदवारासोबत प्रचाराला कोणीही फिरणार नाही, अशा शपथही घेण्यात आली आहे. 

ज्या ठिकाणी सरपंचपद खुल्या प्रवर्गाकडे आहे. अशा ठिकाणी उमेदवारांची मोठी गर्दी आहे. यातून माघार घेण्यासाठी गावकारभाऱ्यांनाही रात्री उशीरापर्यंत समजूत काढवी लागली आहे. जिल्ह्यात सध्या 433 ग्रामपंचायतींतील मधील 4 हजार 27 सदस्यांसाठी 15 हजार हून अधिक उमेदवारी अर्ज आले आहे. ऐवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आल्यामुळे नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागत आहेत. दरम्यान, उद्या माघारीनंतरही जिल्ह्यातील ग्रापंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

 
निवडणूक असणाऱ्या ग्रामपंचायती : 433 
प्रभाग संख्या : 1492 
सदस्य संख्या : 4027 
मतदान केंद्र : 1781 
मतदान : 15 जानेवारी 
मतमोजणी : 18 जानेवारी 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT