gram panchayat election 2021 Voting update kolhapur 
कोल्हापूर

ग्रामपंचायत गडमुडशिंगीत चुरशीने मतदान सुरू: आतापर्यंत 32 टक्के मतदान 

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी  (कोल्हापूर) :  ग्रामपंचायत गडमुडशिंगी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचंड चुरस असून या ठिकाणी काँग्रेस आघाडी, भाजप आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व आरपीआय अशी तिरंगी लढत होत आहे. दरम्यान सकाळी सात वाजता सहा प्रभागांसाठी मतदानास प्रारंभ झाला. सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. मतदानासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.


 विद्यमान सत्ताधारी भाजपप्रणीत  कै. शिवाजीराव कृष्णात पाटील शेतकरी विकास आघाडी चे नेतृत्व तानाजी कृष्णात पाटील हे करीत असून काँग्रेस प्रणित सतेज  पाटील आघाडीचे नेतृत्व डॉ. अशोकराव पाटील हे करीत आहेत. तर राष्ट्रवादीचे आप्पासाहेब धनवडे आरटीआय चे नंदकुमार गोंधळी व शिवसेनेचे पोपट दांगट यांनी बहुजन विकास आघाडी द्वारे तिसर्‍या आघाडीचे आव्हान काँग्रेस  व भाजप  आघाडीच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यां समोर ठेवले आहे.

 करवीर पूर्वभागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून व अनेक दिग्गजांचे भविष्य या ठिकाणी पणाला लागले असल्यामुळे गडमुडशिंगी ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरली आहे. प्रचाराच्या बाबतीतही अनेक अभिनव संकल्पना यावेळी मतदारांना पहायला मिळाल्या.  घरोघरी मतदारांची संपर्क साधून कार्यकर्त्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. प्रचंड चुरस असल्यामुळे विजया बाबत कोणाचीही ठामपणे खात्री देता येत नाही .

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT