gram panchayat election atmosphere nani bai chikhalikar 
कोल्हापूर

नानीबाई चिखलीतील दूरंगी सामना जिंकणार कोण?

रमजान कराडे

नानीबाई चिखली (कोल्हापूर)  : विकासाचे राजकारण करण्यासाठी येथील ग्रामविकास सुकाणू समितीने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बिनविरोधासाठी कोण ? यावर एकमत न झालेने बिनविरोधाचा बार फुसका ठरला. यातूनच आता महाविकास आघाडी विरूद्ध ग्रामविकास आघाडी असा दुरूंगी सामना होत आहे. निवडणूकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरवात झाली असून केलेली विकासकामे, झालेले अतिक्रमण, भ्रष्टाचार, स्वच्छ पाणीपुरवठा आदी मुद्यांवर  चर्चा घडत आहेत.

सर्वपक्षीय स्थानिक सुकाणू समितीने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीला जोरदार हालचाली केल्या. त्यादृष्टीने जागा वाटपाचे धोरण निश्चित करताना मुश्रीफ गटास पाच, मंडलिक, राजे गटास प्रत्येकी तीन, संजय घाटगे गटास दोन जागा देण्याचे निश्चित केले.परंतु बिनविरोधसाठी कोण जाणार यावर एकमत न झाल्याने बिनविरोध निवडणूकीस खीळ बसली अन् निवडणूक लागली. 

निवडणुकीसाठी मुश्रीफ गटाचे अरुण भोसले, प्रविण भोसले, मंडलिक गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले,संजय घाटगे गटाचे सुरेश पाटील यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केली. तर राजे समरजितसिंह घाटगे, स्वाभिमानी मंडलीक गट, वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येताना ग्रामविकास आघाडी स्थापन केली. याचे नेतृत्व गोपाळ काटकर, नरहरी संकपाळ, रवी मगदूम, प्रदीप कांबळे करीत आहेत. 

13 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात असून निवडणूकीत दोन्ही आघाडीने तरूण रक्ताला जास्त संधी दिली आहे. याचबरोबर तेरा महिला उमेदवारांपैकी बारा महिला प्रथमच निवडणूक लढवित आहेत. यामध्ये महाविकास आघाडी कडून अल्लाबक्ष सय्यद, दीपक देवडकर, साधना जाधव, श्रीशैल नुल्ले, ज्योती डवरी, युवराज कुंभार, शोभा चौगुले, विजय घस्ती, सरस्वती चिखलीकर, जया गळतगे, कुमार संकपाळ, छाया चव्हाण, मनीषा पाटील यांना संधी मिळाली आहे. तर विरोधी ग्रामविकास आघाडी कडून रवींद्र कस्तुरे, शालन पाटील, बाळासो काटकर, बाळकृष्ण काईंगडे, वैशाली काळेबेरे, मल्लया जंगम, ऐश्वर्या काईत, प्रदीप कांबळे, महानंदा कांबळे, राणी तूकान, सुनिल खोत, मंगल चव्हाण, यांना संधी मिळाली. तर तंटामुक्त अध्यक्ष नसरुद्दीन नाईक, शुभांगी घाटगे अपक्ष लढत आहेत. 

निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून प्रामुख्याने 'ब' वर्ग पर्यटनाच्या माध्यमातून झालेली विकासकामे, सहा कोटींची सुरू असलेली रस्त्यांची कामे तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण, निकृष्ट बांधलेल्या गटारीत सदस्यांनी मिळवलेली टक्केवारी, स्वच्छ पाणीपुरवठा, तलावाचे सुशोभीकरण आदी मुद्दे गाजत आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तीन भोसलेंमुळे निवडणूकीतील रंगत कमी झाल्याची चर्चा सुरू असली तरी काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दूरंगीचा हा सामना कोण जिंकणार याचीच उत्सुकता लागली आहे. 

एकूण मतदार -  4552

पुरूष मतदार - 2342

स्त्री मतदार - 2210

प्रभाग - 5   
सदस्य - 13

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT