gram panchayat election company of canada on social media for free in kolhapur 
कोल्हापूर

‘आता नाही, तर पुन्हा नाही’ ; सोशल मीडियातून स्वस्तात मस्त होतोय प्रचार

संभाजी निकम

शिरोली दुमाला (कोल्हापूर) : सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत आहे. गेल्या निवडणुकीला जी चूक झाली, ती पुन्हा होऊ नये, यासाठी उमेदवार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने प्रचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आता प्रचारही ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे.

आपल्या उमेदवाराचा स्टेटस्‌ लावणे, गावातील व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर पॅनेल व उमेदवाराचा फोटो टाकणे, काही मराठी लोकगीतांचा आधार घेत आपल्या उमेदवाराचे समर्थन व स्थानिक आघाडीचा झेंडा घेऊन प्रचार केला जात आहे. ‘आता नाही, तर पुन्हा नाही’, ‘एकटा टायगर’, ‘आमचं ठरलंय’, ‘फिफ्टी फिफ्टी’ अशा शेलक्‍या विशेषणांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडत आहे.

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्‌स ॲपद्वारे उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. असा स्वस्तात मस्त घरबसल्या प्रचार होत असून, त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. कोरोनामुळे निवडणूक प्रचारावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. तसेच प्रशासनानेही प्रचार पद्धतीवर अनेक निर्बंध घातले आहेत.

पूर्वी असंख्य कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन उमेदवार प्रचार करत होते; पण आता ठराविक कार्यकर्त्यांना घेऊनच उमेदवाराने प्रचार करावा, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, असे नियम घातले आहेत. त्यामुळे उमेदवारांचीही गोची झाली आहे. त्यामुळेच उमेदवारांचा सोशल मीडियावरून प्रचार वाढला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT