gram panchayat election result political marathi news kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात राष्ट्रवादी-कॉंग्रेसची बाजी ; शिवसेना, भाजपचीही मुसूंडी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : जिल्ह्यातील हातकणंगले, गगनबावडा, राधानगरी, कागल, आजरा व चंदगड तालुक्‍यांतील १६० ग्रामपंचायतींमध्ये आज सरपंच निवडीचा बार उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेनेही यश मिळविले. गावपातळीवरील निवडणुकीत महाविकास आघाडी फॉर्मात असल्याचे चित्र आहे.    

कागल, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, आजरा व चंदगड तालुक्‍यांतील १६० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच नियुक्ती झाली. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, व स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. वैयक्तिक पातळीवर राष्ट्रवादीला सर्वाधिक ३६, शिवसेनेला २०, भाजपला १५ व काँग्रेसला नऊ सरपंचपदे मिळाली आहेत. कागल तालुक्‍यात राष्ट्रवादीला सर्वाधिक ३१ सरपंचपदे मिळाली आहेत. 

काँग्रेसचे अनेक सरपंच महाविकास आघाडी वा स्थानिक आघाड्यांमध्ये वाटून गेले आहेत. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षीय, महाविकास आघाडी, स्थानिक विकास आघाडीच्या पातळीवर जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आला झेंडा फडकवला आहे. 

खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे यांच्या तर भाजप जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) समरजिसिंह घाटगे यांनीही भाजपला बळ दिले आहे. याशिवाय दोन्ही मंत्र्यांनी या सहा तालुक्‍यातील आपआपल्या तालुक्‍यात पक्षीय पातळीवर चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. ८ गावांमध्ये महाविकास आघाडी तर ५१ गावांमध्ये स्थानिक विकास आणि महाविकास आघाड्यांनी यश मिळावले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत.  

कागल तालुका : 
राष्ट्रवादी - ३१
शिवसेना - १५
भाजप - ५ 
वैयक्तिक गट - २
एकूण : ५३


राधानगरी तालुका :
काँग्रेस- ४
राष्ट्रवादी- ५
शिवसेना - २
जनता दल - १
शेकाप - १
स्थानिक आघाडी - ६ 
एकूण : १९


गगनबावडा तालुका : 
काँग्रेस- ५
भाजप -१
जी. पी. शिंदे -१
स्थानिक आघाडी - १
एकूण : ८


हातकणंगले तालुका :
विकास आघाडी - ८
सर्वपक्षीय आघाडी - ३
शिवसेना - ३
जनसुराज्य - ३
भाजपा- १
ताराराणी आघाडी- ३
एकूण : २१

आजरा तालुका : 
विकास आघाडी व स्थानिक आघाडी - १८
भाजपा- ८ 
एकूण : २६


चंदगड तालुका :
विकास आघाडी व स्थानिक आघाडी - ३३


* पक्ष, आघाडी, महाविकास, स्थानिक आघाडी पातळीवरील मतदान :
राष्ट्रवादी- ३६
शिवसेना- २०
भाजप -१५
काँग्रेस - ०९ 
जनसुराज्य -०३
ताराराणी आघाडी - ०३
शेकाप - ०१
जनता दल -०१
वैयक्ति गट - ०३
स्थानिक/महाविकास - ५१
स्थानिक आघाडी - ०७
विकास आघाडी-०८
सर्वपक्षीय आघाडी - ०३

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court ची रेल्वेच्या 'सेकंड-क्लास पॅसेंजर' शब्दप्रयोगावर नाराजी; अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

Pune: मिरज सभापती-उपसभापतींची निवड रद्द; विभागीय आयुक्तांचे फेरनिवडणुकीचे आदेश; विशाल पाटील यांना धक्का

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवर शरद पवारांचा सरकारला इशारा; मुदतीत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Ahilyanagar: बाबा, दारू विकू नका; लेकीनं शपथ घालताच बापानं दुकानाला लावलं कुलूप, सुरू केला नवा व्यवसाय

Rohit Sharma Retirement: रोहितच्या निवृत्ती प्रकरणात मोठा ट्विस्ट! अगरकर-गंभीरवर BCCI नाराज? इनसाइड स्टोरी आली समोर,नेमक काय घडल ?

SCROLL FOR NEXT