gram panchayat election Voting will take place on January 15 and counting will take place on January 18 
कोल्हापूर

कोल्हापुरात ४३३ ग्रामपंचायतींचे वाजले बिगुल: मतदारांना आमिष दाखविल्यास होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल काल वाजले. जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ४ जानेवारीला अर्ज मागे घेणे व चिन्हवाटप केले जाईल. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित ४३३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. 

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने कालपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. मतदारांना आमिष दाखविल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मंत्री, आमदार, खासदारांना आचार संहिते दरम्यान एखाद्या कामाची घोषणा करता येणार नाही. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी पूर्वतयारी आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आयोगाकडून येणाऱ्या विविध सूचना व नियमांचे पालन, कोरोना पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घ्यावी, अशाही सूचना आहेत. प्रचारा दरम्यान होणाऱ्या जेवणावळीवर नजर ठेवली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान व मतमोजणी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जाईल. 


दरम्यान, ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाल्यावर गावागावांत भेटीगाठींना उधाण आले होते. आता आज (ता. १२)पासून कार्यकर्ते आणि इच्छुकांनी पायाला भिंगरी लावूनच फिरण्याची तयारी केली आहे. आरक्षण सोडत पुढे ढकलली 
जिल्ह्यात एक हजार २५ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (ता. १५) जाती- जमाती व प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण स्त्री सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघणार होती. दरम्यान, ही आरक्षण सोडत काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मतदानानंतर म्हणजेच १५ जानेवारीनंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम
  निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध :  ता. १५ डिसेंबर
  अर्ज भरणे :  २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, स. ११ ते दु. ३
  अर्ज छाननी :  ३१ डिसेंबर सकाळी ११ पासून
  अर्ज माघारी :  ४ जानेवारी २०२१ दुपारी ३ पर्यंत 
  चिन्हवाटप : ४ जानेवारी दुपारी ३ नंतर 
  मतदान :   १५ जानेवारी २०२१, स. ७.३० ते सायं. ५.३०
  मतमोजणी :  १८ जानेवारी 
  अधिकृत निकाल जाहीर :  २१ जानेवारी


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT