कोल्हापूर

नांदणी आरोग्य केंद्रात राडा; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गणेश शिंदे

जयसिंगपूर (कोल्हापूर) : कोरोना लस (covid 19) वाटपामध्ये नांदणी आरोग्य केंद्राकडून वारंवार अनियमितता व पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप करीत (Shirdhon)शिरढोण (ता. शिरोळ) ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नांदणी आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्याना धारेवर धरले. अधिकारी व आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त बनले. (gram-panchayat-members-and-social-workers-agitation-at-nandani-covid-19-health-center-kolhapur-news)

शिरढोणसह इतर सहा गावांचा समावेश नांदणी आरोग्य केंद्रात करण्यात आला आहे. शिरढोणच्या लोकसंख्येच्या प्रमाणात व इतर गावांच्या तुलनेत शिरढोणची लसीकरणाची टक्केवारी ४६.६३ टक्के इतकी असून ती फारच कमी झाली. तथापि इतर गावांची लसीकरणाची टक्केवारी यापेक्षा जास्त असताना देखील आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यानी त्याच गावांना आज लसीचे वाटप केले असून शिरढोणला लस दिली नाही. याचा जाब आंदोलकांनी विचारला. सुरूवातीला अधिकाऱ्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली. आंदोलकांनी अधिकाऱ्याना खोलीत कोंडून घालण्याची योजना आखली तेव्हा अधिकारी नमले व वस्तूस्थिती मान्य केली.

शासनाकडून आरोग्य केंद्राला जास्तीत जास्त लस पुरवठा करावा यासाठी आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांनी मंद लसीकरणाला सरकार दोषी असल्याने सरकारचा जाहीर निषेध करून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. शेवटी आंदोलक व शिरोळचे आरोग्य अधिकारी दातार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. वैद्यकीय अधिकारी सौ. अस्वले यांनी नजीकच्या काळात शिरढोणच्या लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने पुढील अनर्थ टळला. येथून पुढे लसीची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न दिल्यास नांदणी आरोग्य केंद्राला भविष्यात कुलूप लावून आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकानी दिला.

आंदोलनात भास्कर कुंभार, विश्वास बालिघाटे, शहाबुदिन टाकवडे , नागेश कोळी , साहीर बाणदार , शक्ती पाटील , पंकज कुंभार , अरिहंत कापसे, हैदरअली मुजावर , राजु नदाफ, रणजित यादव, रावसो बिरोजे यासह अनेक ग्रामस्थ सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT