gram panchayat result 2021 maharashtra kolhapur gadmudshingi 
कोल्हापूर

Gram Panchayat Results : सफाई कामगार आजी झाल्या गावच्या कारभारी 

प्रविण जाधव

गांधीनगर (कोल्हापूर) - 1973 पासून गडमुडशिंगी गावामध्ये सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या द्रौपदी रामचंद्र सोनुले यांनी वयाच्या 73 व्या वर्षी नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरुन ग्रामपंचायत सदस्या होण्याचा मान मिऴविला. ज्या गावामध्ये स्वच्छतेचे काम केले त्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून जाण्याचा मान त्यांनी मिळविल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 

द्रौपदी सोनुले यांनी अतिशय गरिबीतून संसाराचा डोलारा सांभाळला. गेली जवळपास 48 वर्षे त्यांनी गावामध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम केले. संपूर्ण गावातून त्या दुरपामावशी म्हणून प्रसिध्द आहेत. सुरुवातीचा पगार होता फक्त 60 रुपये महिन्याला. आपण भले आणि आपले काम भले या सेवाभावी वृत्तीतून त्यांनी गावची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणाची कधीही तक्रार झाली नाही. गावची सेवा करत संसारातील सुखदुःखे त्यांनी झेलली. पतीच्या माघारी मुलांचा संसार फुलविला. एका मुलीचे लग्न लावून दिले. दोन मुलांचा संसार त्यांनी सांभाळला. दुर्दैवाने 2018 मध्ये त्यांच्या एका मुलाचे निधन झाले. पण दुःखावर मात करत गावची सेवा त्या करत राहिल्या. जानेवारी 2021 ची ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे गावचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी द्रौपदी सोनुले यांना प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी दिली. त्यांनी सफाई कर्मचाऱ्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि निवडणुकीचा अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात उमेदवार होत्या त्या माजी सरपंचांच्या पत्नी. सुरुवातीला त्यांच्यासाठी वातावरण तितकेसे चांगले नव्हते. परंतु दुरपामावशीने केलेल्या सेवेचा वसा मतदारांनी जाणला आणि त्यांना ग्रामपंचायत सदस्य हे मानाचे पद दिले. दुरपामावशी निवडून आल्या आणि त्यांच्या सेवेचे सार्थक झाल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. 

हे पण वाचा - Gram Panchayat Results : आबिटकर गटाची बाजी ; माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची आघाडी पराभूत     
 
आमच्या लहानपणापासून दुरपामावशींची सेवा आम्ही पहात आहोत. वडील कृष्णात पाटील, भाऊ कै. शिवाजीदादा पाटील आणि स्वतः मी सरपंच असल्यापासून दुरपामावशींनी गावाची केलेली सेवा आम्ही पाहिली आहे. त्यांनी केलेल्या सेवेचे सार्थक व्हावे म्हणून त्यांना उमेदवारी दिधी आणि गावकर्यांनी ही निवड सार्थ ठरविली. 
- तानाजी पाटील, माजी सरपंच


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

SCROLL FOR NEXT