grampanyat election win by a 73 year old lady in gandhinagar kolhapur 
कोल्हापूर

७३ व्या वर्षी द्रौपदीमावशींनी दिला राजीनामा अन् घेतली राजकारणात उडी ; गावच्या नव्या कारभारीची पंचक्रोशीत चर्चा

प्रवीण जाधव

गांधीनगर (कोल्हापूर) : गडमुडशिंगी येथे १९७३ पासून सफाई कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या द्रौपदी रामचंद्र सोनुले यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी मानधनावरील नोकरीचा राजीनामा देऊन रणांगणात उतरून ग्रामपंचायत सदस्या होण्याचा मान मिऴविला. विशेष म्हणजे त्यांनी माजी सरपंचांच्या पत्नीलाच धक्का दिला. जेथे स्वच्छतेचे काम केले तेथेच सदस्या म्हणून काम करण्याचा मान मिळविला. 

द्रौपदी सोनुले ४८ वर्षे सफाई कर्मचारी आहेत. गावची सेवा करत संसारातील सुख-दुःखे त्यांनी झेलली. पतीच्या माघारी मुलांचा संसार फुलविला. मुलीचे लग्न लावून दिले. दोन मुलांचा संसार सांभाळला. दुर्दैवाने २०१८ मध्ये एका मुलाचे निधन झाले; पण दुःखावर मात करत गावची सेवा करत राहिल्या. जानेवारी २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी द्रौपदी सोनुले यांना प्रभाग एकमधून उमेदवारी दिली.

त्यांनी मानधनावरील सफाई कर्मचाऱ्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात उमेदवार होत्या त्या माजी सरपंचांच्या पत्नी. दुरपामावशीने केलेल्या सेवेचा वसा मतदारांनी जाणला आणि त्यांना सदस्य पद दिले. 

"लहानपणापासून दुरपामावशींची सेवा पाहत आहोत. वडील कृष्णात पाटील, भाऊ शिवाजीदादा पाटील आणि स्वतः मी सरपंच असल्यापासून दुरपामावशींनी गावची केलेली सेवा आम्ही पाहिली आहे. त्यांनी केलेल्या सेवेचे सार्थक व्हावे म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि ग्रामस्थांनी निवड सार्थ ठरविली."

- तानाजी पाटील, माजी सरपंच, गडमुडशिंगी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT