Granddaughter Goes Directly To The Collector for quarantine Kolhapur Marathi News
Granddaughter Goes Directly To The Collector for quarantine Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

दिव्यांग नातीने फिरवला थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, ...अन्‌ 102 वर्षीय वृद्धेचा होम क्वारंटाईनचा प्रश्‍न लागला मार्गी

दिनकर पाटील

नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) एका दिव्यांग मुलीचे आई-वडील व आजीला कोरोनाची लागण झाली. आई-वडील कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. 102 वर्षीय आजीलाही तेथेच नेण्याच्या हालचाली सुरू होत्या. तसे झाले, तर दिव्यांग मुलीवर सारी जबाबदारी आली असती. यामुळे आजीवर घरीच उपचार व्हावेत व स्वत:सह बहिणीला होम क्वारंटाईन करण्यासाठी दिव्यांग मुलीचा आग्रह होता. स्थानिक प्रशासन ऐकत नसल्याने तिने थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून कुटूंबावर ओढवलेली बिकट परिस्थिती कथन केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही या दिव्यांग मुलीची समस्या ऐकून घेवून अखेर आजीवर घरीच उपचार सुरू ठेवण्यास आणि दोघ्या बहिणींनाही होम क्वारंटाईनला परवानगी दिली. 

संबंधित कुटूंबातील 57 वर्षीय पुरूष एका कारखान्याच्या माध्यमातून कोरोना बाधित झाले. त्यांच्यानंतर पत्नी व त्यांची 102 वर्षीय आई बाधित आढळली. यामुळे आजीसह 24 वर्षीय दिव्यांग मुलगी व तिची 15 वर्षीय बहिण दोघींनाही संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू होता. मुळात आई-वडील कोविड सेंटरला असल्याने आजीच्या व्यवस्थेची जबाबदारी या दोन मुलींवरच आहे. शिवाय घरी जनावरे आहेत. त्यांची व्यवस्था कोण करणार, हा प्रश्‍न होता. यामुळे घर सोडून जाणे अडचणीचे होते. दरम्यान, स्थानिक प्रशासन या बहिणींना संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची सूचना करीत होते.

डॉक्‍टर्सना या सर्व परिस्थितीची कल्पना दिली. परंतु, प्रशासन समजावून घेईना. यामुळे अखेर त्या दिव्यांग मुलीने थेट जिल्हाधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. रात्री नऊच्या सुमारास तिने केलेला फोन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला. त्यावेळी ते एका महत्वाच्या बैठकीत असल्याने त्या मुलीला त्यांनी व्हॉटस ऍपवर माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर दिव्यांग मुलीने कोरोना महामारीमुळे कुटूंबावर ओढवलेल्या बिकट संकटाची सविस्तर माहिती दिली. आजीचे वयोमान, जनावरांचा प्रश्‍न या मुद्यावर तिने थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या मुलीची समस्या जाणून घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानुसार वयोवृद्ध आजीवर मुंगूरवाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पी. व्ही. खरोडे, पर्यवेक्षक देवानंद तानवडे, परिचारिका ए. वाय. नाईक यांच्या मार्गदर्शनाने घरीच उपचार सुरू झाले आहेत. दोघा बहिणींनाही घरीच क्वारंटाईन केले आहे. 

दरम्यान, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, मंडल अधिकारी प्राची येसरे व आरोग्य यंत्रणा संबंधित कुटूंबाच्या घरी भेट देवून उपचाराबाबत विचारपूस केली. खबरदारीच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी देसाई यांनी या बिकट प्रसंगाला गांभीर्याने प्रतिसाद देत दिव्यांग मुलीच्या धैर्यालाही पाठबळ देवून प्रशासनाची चुणूक दाखवून दिली. या दिव्यांग मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतूकही होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह तालुका प्रशासनाने दाखवलेल्या सहानुभूतीमुळे हे कुटूंब भारावून गेले आहे. 

घरीच उपचारासाठी तत्परता दाखवली
अचानक ओढावलेल्या कोरोना संकटामुळे आमचे कुंटूब हादरून गेले. अशा बिकट प्रसंगी मी न खचता सकारात्मक विचाराने आजी, आई-वडीलांना आधार दिला. शंभरी पार झालेली आजी, जनावरे यांचा विचार करून जिल्हाधिकारी साहेबांशी मोबाईलद्वारे थेट संपर्क साधला. कुंटूबांवर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी साहेबानी दखल घेवून आजीवर घरीच उपचारासाठी तत्परता दाखवली. आजीची प्रकृतीही चांगली आहे. 
- संबंधित दिव्यांग मुलगी, हडलगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT