grandmother Battle won in 103rd year covid 19 fighters in kolhapur 
कोल्हापूर

खमक्‍या आज्जी पुन्हा झाल्‍या ठणठणीत...! : १०३ व्या वर्षी जिंकली लढाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : या आज्जी तशा खमक्‍या. रहायला पायमल वसाहतीत. शंभरी ओलांडली तरी त्या ठणठणीत. घरची काही जबाबदारी नसली तरी परसबागेत भाज्या असोत किंवा आवडीची झाडं लावणं असो यातच त्या रमतात आणि झाडांसोबतचा हाच आनंद साऱ्यांना वाटत राहतात. दहा दिवसापूर्वी त्यांच्या एकूणच कुटुंबाला कोरोनानं गाठलं. सर्वांना क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्या एकट्याच पडल्या. भरीस भर म्हणून त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर उपचार कुठे करायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला. येथील व्हाईट आर्मीने ती जबाबदारी स्वीकारली आणि आज या आज्जी कोरोनावर मात करून घरीही परतल्या. बाळाबाई मोकाशी असं या १०३ वर्षांच्या आज्जींचे नाव. 


मोकाशी परिवार एकत्र कुटुंब पध्दतीची परंपरा पुढे नेणारा. घरात दहा सदस्य. कोरोनाचा विळखा घट्ट होत गेला आणि घरातील सर्वांचेच अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी क्वारंटाईन व्हावे लागले. त्यानंतर आज्जींचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कुठे ॲडमिट करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला. कारण वय १०३ आणि त्यातही कोरोना पॉझिटीव्ह. अनेक हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. पण, व्यवस्थापनाने नकार दिला.

घरातील इतर सदस्यांच्या मनाची घालमेल वाढत होती. कारण ही मंडळी जिथे क्वारंटाईन आहेत तिथूनच फोनवरून ही सारी व्यवस्था करत होती. अखेर त्यांनी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली. आज्जी दहा दिवसापूर्वी व्हाईट आर्मीच्या दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांचे नातू बबन आणि घरचे सदस्य त्यांना घरी नेण्यासाठी आज आले. व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमुळे तिला कोरोनावर मात करणे शक्‍य झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.   

वाढदिवस अन्‌ रोपे...
मुळातच आज्जी इतक्‍या खमक्‍या की पहिला एखादा दिवस त्यांना आधार द्यावा लागला. मात्र, त्यानंतर उपचार सुरू असतानाही त्या सर्वांशी मनमोकळा संवाद साधायच्या. जुन्या आठवणीत रमायच्या. डॉक्‍टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करायच्या आणि परिणामी दहा दिवसांनंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. योगायोगाने आजच त्यांचा १०३ वा वाढदिवस. त्यामुळे सर्वांनी मिळून तो साजरा केला. आज्जींच्या आवडीची दोन रोपेही कोविड सेंटर परिसरात लावण्यात आली. यावेळी ‘केएमए’चे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शीतल पाटील, डॉ. गीता पिलाई, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रशांत शेंडे, विनायक भाट आदी उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Father: स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाचे अपडेट्स

Pune Traffic Update : आज मध्यरात्रीपासून सिंहगड घाट वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा आदेश; हे आहेत पर्यायी मार्ग!

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

"काय फालतू गाणं आहे !" दिग्दर्शकाने 31 वर्षांपूर्वी रिजेक्ट केलेलं गाणं पण नंतर तेच झालं सुपरहिट

Latest Marathi News Live Update : घटना घडली तेव्हा घरात नव्हतो, खिडकीतून आत प्रवेश केला, गौरीचा पती अनंत गर्जेचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT