grandmother fraud case kolhapur fraud marathi news 
कोल्हापूर

धक्कादायक : मृत आजी झाल्या जिवंत

युवराज पाटील

कोल्हापूर :  कोण कोणाची कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. व्यक्ती जिवंत असो वा मृत फसवणूकीचे प्रकार घडतचं असतात. असाच एक प्रकार मौजे बालिंगा तालुका करवीर येथे घडला आहे. काय आहे प्रकार जाणून घेउया.

 मौजे बालिंगा तालुका करवीर येथील सावित्रीबाई माळी यांचे नाव सातबारात दाखल आहे. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2013 रोजी झाला आणि त्यांच्या नावाचा मोजणी अर्ज करवीर भूमी अभिलेखा कार्यालयाकडे नोव्हेंबर 2018 मध्ये दाखल झाला जी व्यक्ती मृत झाले आहे तिच्या नावे मोजणी अर्ज दाखल झाला हा सर्व प्रकार धक्कादायक  आहे.

शिष्टमंडळाने अधीक्षकांना धरले धारेवर 

गुंठेवारी लेआउट प्रकरणात मृत आजीबाईंचा मृत्यू झालेल्या आजींच्या नावे मोजणी अर्ज करून त्यांचे छायाचित्र स्वाक्षरीसह सादर करण्यात आले. मृत व्यक्ती अंगठा देण्यासाठी आलीच कशी असा सवाल करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज उपभुमी अभिलेखा अधीक्षकांना धारेवर धरले.  संचालकांची स्वाक्षरी नसताना मंजूर झालेले सर्व लेआउट येत्या आठ दिवसात रद्द करावे. आणि  संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी आज शिष्टमंडळाने केली.

 मौजे बालिंगा तालुका करवीर येथील सावित्रीबाई माळी यांचे नाव सातबारा दाखल आहे. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 2013 रोजी झाला आणि त्यांच्या नावाचा मोजणी अर्ज करवीर भूमी अभिलेखा कार्यालयाकडे नोव्हेंबर 2018 मध्ये दाखल झाला जी व्यक्ती मृत झाले आहे तिच्या नावे मोजणी अर्ज दाखल झाला हा सर्व प्रकार धक्कादायक असून येथे कोणीही अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी तसेच गुंठेवारीचा गेल्या दीड वर्षातील अभ्यास करून वादग्रस्त प्रकरण आहेत. ती रद्द व्हावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळुंखे, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण आदींचा शिष्टमंडळात समावेश होता हा प्रकार धक्कादायक असून संबंधित आठ दिवसात कारवाईचे आश्वासन भुमिअभिलेख उपाध्यक्ष सुधाकर पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT