कोल्हापूर

काळ आला होता, पण ; आजीच्या धाडसामुऴे टऴला 'हा' अनर्थ 

सकाळ वृत्तसेवा

बिद्री (कोल्हापूर) : वेळ सकाळी ९ वाजता...नदीघाटावर धुणे धुवायला गेल्यावर तोल जाऊन नदीत पडलेल्या नातीला वाचवण्यासाठी आजीने आरडाओरडा केला, परंतु आजूबाजूला कोणीच नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. शेवटी आजी व नातीने प्रसंगावधान राखून मोठ्या प्रयत्नाने पाण्याबाहेर येण्यात यश मिळविले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ही मुलगी वाचल्याची घटना बिद्री मौनीनगर येथे घडली.

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, बिद्री कारखाना साईटवर दिलीप शेटगे हे पत्नी, मुलगा, मुलगी व आईसह भाड्याच्या घरात राहतात. आज सकाळी दिलीप यांची आई शांताबाई १२ वर्षीय नात रसिका हिला घेऊन मुख्य रस्त्यावर असलेल्या दुधगंगा नदीघाटावर धुणे धुवायला गेल्या होत्या. यावेळी नदीघाटावर केवळ त्या दोघीच कपडे धूत होत्या. कपडे धूत असताना अचानक रसिकाचा तोल जाऊन ती नदीच्या पाण्यात पडली. नदीतील पाणी वाहते असल्याने व पोहता येत नसल्याने ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जावू लागली.

आजीच्या धाडसामुऴे टऴला अनर्थ 

अनपेक्षित घडलेल्या या घटनेने शांताबाई भेदरुन गेल्या. त्यांनी नातीला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. परंतू आजूबाजूला कोणीच नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. शेवटी रसिकानेच स्वतः हातपाय मारुन पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजीनेही धाडसाने पाण्यात शिरुन रसिकाच्या हाताला धरुन बाहेर खेचले.

आजीचा नातीला तिला धीर...

यावेळी आजी व नातीने प्रसंगावधान राखून मोठ्या प्रयत्नाने पाण्याबाहेर येण्यात यश मिळविले. पाण्याबाहेर आल्यावर रसिका खुपच भेदरलेली होती. आजीने तिला धीर देत घरापर्यंत आणले.या कठीण प्रसंगी रसिका व तिच्या आजीने दाखवलेल्या धाडसाने दोघींचा जीव वाचल्याने, काळ आला होता पण वेळ आली नव्हती.... याची प्रचिती आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT