Grant of transportation allowance to the students 
कोल्हापूर

सरकारचा मोठा निर्णय; आता विद्यार्थ्यांनाही मिळणार भत्ता 

राजेंद्र पाटील

कोल्हापूर - पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक किलोमीटर व सहावी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर अंतराच्या आत शाळा नाहीत, अशा राज्यातील 917 वाड्या-वस्त्यांमधील सुमारे 4875 विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला आहे. सध्यातरी कमी पटाच्या शाळा बंद न करता तेथील विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता शासनाने जाहीर केला आहे. 

यापूर्वी भाजप शासनाने वीस पटाच्या आतील 13 हजार 544 शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1314 शाळा बंद करण्याचे आदेश दिले; मात्र या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर विविध संघटनांनी आंदोलनाची हाक दिली. शिक्षक संघटनांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर शाळा बंद मोहीम थांबविण्यात आली. ज्या शाळेत फारच कमी म्हणजे दोन-तीन विद्यार्थी पट होता व त्या परिसरात नजीक शाळा होती, अशा केवळ 391 शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळा बंदबाबत भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन शासनास अहवाल सादर केला होता. 

दरम्यान, सर्व जिल्ह्याकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार एक व तीन किलोमीटर अंतरात ज्या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध होत नाही, अशा वाड्या-वस्त्यांची व विद्यार्थ्यांची माहिती मागविली होती. या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने राज्यातील 917 वाड्या-वस्त्यांमधील 4875 विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर केल्याचे एका आदेशाद्वारे जाहीर केले. 

शाळा बंदसाठी नव्हे भत्त्यासाठी 
राज्यातील 917 शाळा बंद करण्याचा आदेश शासनाने दिल्याची चर्चा कालपासून शिक्षण क्षेत्रात व सोशल मीडियावर सुरू झाली आहे; मात्र शाळा बंद केलेल्या नाहीत. 917 वाड्या वस्त्यांमधील शाळा चालूच राहणार असून, तेथील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मंजूर केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT