Great jealousy in OBC women's wards due to mayoral reservation 
कोल्हापूर

महापौरपद आरक्षणामुळे ओबीसी महिला प्रभागांत मोठी ईर्षा

डॅनिअल काळे

कोल्हापूर, ः कोल्हापूर महापालिकेच्या पुढच्या अडीच वर्षासाठीचे महापौरपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या आरक्षणातून निवडणूक लढविणाऱ्या आणि निवडून येणाऱ्या अकरा महिला या पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील निवडणूक मोठ्या चुरशीची आणि अटीतटीच्या होणार आहेत. 
महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी 11 आरक्षित प्रभाग, ओबीसीसाठी 22 त्यापैकी 11 प्रभाग ओबीसी महिला, सर्वसाधारण महिलासाठी 24 आणि 24 प्रभाग खुले झाले आहेत. महापालिका निवडणुकीची सर्वच प्रभागात चुरस असली तर ओबीसी महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या प्रभागात मोठी चुरस होणार आहे. यंदा तरी महापौरपदावर आपलीच वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रयत्नाचा पहिला टप्पा आरक्षण सोडत होता. सोडतीत मनाप्रमाणे प्रभाग आरक्षण झाल्याने या पदासाठी इच्छुकांना उकळ्या फुटू लागला आहे. ताकद असणाऱ्या प्रभागात मनाप्रमाणे आरक्षण पडले तर निवडणूक सोपी जाते. 

दावेदार प्रभाग 
ओबीसी महिला याच प्रवर्गासाठी पुढची अडीच वर्षे महापौरपद आरक्षित आहे. या 11 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक : 13 रमणमळा, प्रभाग : 24 - साईक्‍स एक्‍सटेंशन, प्रभाग-15 कनाननगर, प्रभाग- 21 टेंबलाईवाडी, प्रभाग- 36 राजारामपुरी, प्रभाग- 49 रंकाळा स्टॅड, प्रभाग- 52 बलराम कॉलनी, प्रभाग - 53 दुधाळी पॅव्हेलियन, प्रभाग - 56 संभाजीनगर बस स्थानक, प्रभाग - 64 शिवाजी विद्यापीठ, प्रभाग - 71 रंकाळा तलाव, या प्रभागांचा समावेश आहे. महापौरपदाची संधी प्राप्त होणार असल्याने ओबीसीसाठी आरक्षित असणाऱ्या प्रभागांवर सर्वांचे लक्ष राहणार आहे. 

नेत्यांचेही राहणार लक्ष 
विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून आरक्षणानंतर प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रित केले आहे. एका प्रभागात एका पक्षाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी उमेदवारी निश्‍चित करतानाही नेत्यांचा कस लागणार आहे. एकाला उमेदवारी देताना अनेकजण रुसणार तर नाहीत ना? याची दखलही नेत्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे. तर उमेदवार निश्‍चित करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे. एकूणच महापालिका राजकारणामुळे येत्या काळात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT