'Green signal' to 2,000 people going to Sangli 
कोल्हापूर

सांगलीत जाणाऱ्या दोन हजार जणांना 'ग्रीन सिग्नल'

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्‍यासह कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या दोन हजार जणांना ग्रीन सिग्नल मिळणार आहे. यामध्ये शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्याकडे जमा झालेल्या अर्जांवर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे.

तहसिल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी आणि उद्योग भवनात बुधवारपासून पास देण्याचे कामाला प्रारंभ झाल्याने शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांना सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 

माजी आमदार उल्हास पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हि कार्यवाही सुरु केली. पाटील यांचे आंदोलन रोखण्यासाठी शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते अनिल देसाई, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विलंबानंतर का होईना प्रतिसाद दिला. 

पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची दोन वेळा भेट घेऊन हा प्रश्‍न सांगितला. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही केली तर कोल्हापूर प्रशासनाने हा प्रश्‍न अधांतरी ठेवल्याने आंदोलनाची स्थिती निर्माण झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याकडून प्रशासनाकडे आलेल्या दोन हजार अर्जांवर कार्यवाही करताना पास देण्याचे काम सुरु केले आहे. 

माजी आमदार उल्हास पाटील यांचे आंदोलन टळले असून शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांचा सांगली जिल्ह्यात जाण्याचा प्रवासही सुखकर झाला आहे. खासदार अनिल देसाई, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही यासाठी उल्हास पाटील यांच्या पाठीशी खंबीर राहून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. उल्हास पाटील यांच्या मार्फत आलेल्या दोन हजार अर्जांना न्याय मिळाला आहे. 

- पराग पाटील, नगरसेवक जयसिंगपूर 

दृष्टिक्षेप

अर्जांवर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु

- बुधवारपासून पास देण्याचे कामाला प्रारंभ

- शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश

- आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने हि कार्यवाही सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT