Guardian Minister Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : 'पूरग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा'; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

कोल्हापूर शहर व ग्रामीण भागात घरामंध्ये आणि शेतात पुराचे (Kolhapur Flood) पाणी शिरले.

सकाळ डिजिटल टीम

‘आमट्टीतून ३ लाख क्युसेक आणि हिप्परगीमधून २ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि आलमट्टी धरणाच्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आहेत.

कोल्हापूर : शहर व ग्रामीण भागात घरामंध्ये आणि शेतात पुराचे (Kolhapur Flood) पाणी शिरले. यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी नुकसानग्रस्त भागाचे वेळेत पंचनामे करावेत. अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनीही संकट ओळखून तातडीने स्थलांतर करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

त्यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा प्रशासनाला सूचना दिल्या. पत्रकार परिषदेत मुश्रीफांनी ही माहिती सांगितली.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे (NDRF), आणखी एक पथक उद्या दाखल होणार आहे. स्थलांतरित नागरिकांना चहा, नाश्ता, भोजन, औषधे व अन्य सोयी-सुविधा वेळेत पुरवा, अशा सूचना मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाबाबत बैठकीत दिल्या.’ जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

हिप्परगीमधून दोन लाख क्युसेक विसर्ग

आलमट्टीतील विसर्गाबद्दल मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘आमट्टीतून ३ लाख क्युसेक आणि हिप्परगीमधून २ लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि आलमट्टी धरणाच्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आहेत. या शिवाय आलमट्टीवर आपले एक अभियांताही पाठवले आहेत. त्यामुळे धरणातील विसर्ग सुरूच आहे.’

सामाजिक संस्थांची मदत घेणार

शहरातील स्थलांतरीतांना० राहण्यासाठी मंगल कार्यालय घेतले जाणार आहे. सेवाभावी संस्था, व्यक्ती यांची मदत घेऊन स्थलांतरितांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येतील. ‘सेंट्रल किचन’ सुरू करून चांगले, गरम आणि ताजे अन्न देण्यात येईल. त्यांना तातडीची मदतही देण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT