Guardian Minister Satej Patil criticism on BJP state president Chandrakant Patil
Guardian Minister Satej Patil criticism on BJP state president Chandrakant Patil 
कोल्हापूर

चंद्रकांतदादा, हॅट्‌ट्रिक नव्हे क्‍लीनबोल्ड! : सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदा पहिल्यांदाच मतदार नोंदणीपासून मतदानापर्यंत सर्व गोष्टी पक्षीय पातळीवर झाल्या आहेत. महाविकास आघाडीने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुले पाचही जिल्ह्यांत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हॅट्‌ट्रिकचे स्वप्न भंगणार असून, ते क्‍लीनबोल्ड होणार आहेत, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. काल त्यांनी दौलतराव भोसले विद्यालय येथे मतदानाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


सतेज पाटील म्हणाले, ‘‘पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली आहे. कारण यामध्ये सुरुवातीपासूनच पक्षीय पातळीवर सर्व गोष्टी घडत आहेत. मतदारांची नोंदणी, प्रचार, मेळावे, मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढणे या सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केले आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असून अत्यंत मायक्रो लेव्हलचे प्लॅनिंग केले आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहले आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा निश्‍चित आहे. चंद्रकांत पाटील यांची हॅट्‌ट्रिक होणार नाही तर ते क्‍लिन बोल्ड होणार आहेत.

त्यांनी आदरभाव व्यक्त केला
सांगली जिल्ह्यातील एका बूथवर भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम समोरासमोर आले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार करून अभिवादन केले. याबाबत सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ओळखीच्या दोन व्यक्ती समोरासमोर आल्यावर नमस्कार म्हणण्याचा शिष्टाचार आहे. त्याप्रमाणे त्यांनी नमस्कार केला असेल. त्याचा वेगळा अर्थ काढू नका.’’

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT