Guardian Minister Satej Patil criticize on chandrakant patil meeting of directors of education and teachers ichlkarnji 
कोल्हापूर

"चंद्रकांतदादा पाटील यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ"

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : चंद्रकांतदादा पाटील हे गेली 12 वर्षे पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. गेली पाच वर्षे सत्तेत होते. त्यांनी पदवीधरांचे प्रश्‍न का सोडविले नाहीत. उलट त्यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्‍नावर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. 


येथील तोष्णीवाल गार्डनमध्ये पूणे पदवीधर व शिक्षण मतदार संघातील महाविकास आघाडीचे अनुक्रमे उमेदवार अरुण लाड व प्रा.आसगांवकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या दोन्ही उमेदवारांना पसंती क्रमांक 1 चे मतदान देवून निवडून आणण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला.


मंत्री पाटील म्हणाले, पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे. शिक्षक मतदार संघातून कोल्हापूर जिल्ह्याला आमदार होण्याचा पहिल्यांचा मान मिळणार असल्यांने प्रा.जयंत आसगांवकर यांना निवडून देवूया, असे आवाहनही त्यांनी केले.


खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन चांगले काम केले आहे. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करण्याची गरज आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा असल्यांने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हा असणार आहे. 


उमेदवार प्रा.आसगांवकर यांचेही भाषण झाले. शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्‍नांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विरोधकांच्या बुध्दीभेद आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार राजू आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, वि.ह. सपाटे, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी.डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले. व्यासपिठावर रविंद्र माने, राहूल खंजीरे, संजय कांबळे, नितीन जांभळे, मुरलीधर जाधव, शेखर शहा आदी उपस्थीत होते.

संपादन - अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT