Guardian Ministers post office collector Busy overnight for the past 15 days kolhapur marathi news
Guardian Ministers post office collector Busy overnight for the past 15 days kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूरात पालकमंत्री @ जिल्हाधिकारी कार्यालय...

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोनामुळे देशावर, राज्यावर आणि जिल्ह्यावर मोठे संकट आले आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी रात्रंदिवस प्रशासन झटत आहे. या सर्वांच्या खांद्याला खांदा लावत जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही कंबर कसली आहे. गेले पंधरा दिवस ना.पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून आहेत. अपुरी झोप, अवेळी जेवण, डोळे तारवटलेले आणि चेहऱ्यावर सतत टेन्शन, अशाही परिस्थितीत ते जिल्हा प्रशासनाला कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी बळ देत आहेत.

जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कोरोनाची सद्यस्थिती समजून घेत असतानाच दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतानाचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात पहायला मिळत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्‍काम

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. अगदी पहिल्या दिवसापासून खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्‍काम ठोकला आहे. कोल्हापुरात कोरोनाग्रस्त भागात येणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी, त्यांच्यावर औषधोपचार, संशयित रुग्णांना कोरोन्टाईन करण्याबाबत प्रशासनाला विश्‍वासात घेवून ना. पाटील निर्णय घेत आहेत. सीपीआर येथील कोरोना कक्ष असो की इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पीटल या ठिकाणी सतत भेटी देवून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनास सज्ज करण्याचे काम पालकमंत्री करत असल्याचे पहायला मिळत आहे. 

सकाळी दहा ते रात्री 12 काम सुरुच

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासूनच विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक, तालुक्‍यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरु संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. दोन दिवसापुर्वीच पालकमंत्र्यांनी होम कोरोनटाईन असलेल्या 400 लोकांना ना.पाटील यांनी फोन करत घरीच राहण्याच्या सुचना केल्या. सकाळी दहा, अकरा वाजता सुरु असलेल्या या आढावा बैठका, रुग्णालयांना भेटी व मुख्यमंत्री आरोग्य मंत्र्यांना रिपोर्टिंग करण्याचे हे काम रात्री 12 वाजेपर्यंत पालकमंत्र्यांकडून सुरु आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांशी चर्चा करुन आपापल्या मतदार संघातील अडचणी व त्यावरील उपाययोजना व पशासनाकडून लागणारी मदत याबाबतही ते सातत्याने विचारपूस करताना दिसत आहेत. 

असा आहे दिनक्रम.... 
सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ना. पाटील यांचा मुक्‍काम जिल्हाधिकारी कार्यालयात असतो. अधिकाऱ्यांची बैठक, आरोग्य विभागाशी चर्चा, उपलब्ध साहित्याची माहिती, नवनवीन मागण्या व त्यासाठी निधीची तरतूद, कायदा आणि सुव्यवस्था, जिवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत होत आहे का यावर लक्ष, कोरोना संशयित, कोरोनटाईन रुग्णांशी संवाद, मुख्यमंत्री,आरोग्यमंत्र्यांशी चर्चा, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे चर्चा करण्यात पालकमंत्री व्यस्त असतात. या सर्व व्यस्ततेतच पालकमंत्री पाटील यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यासह उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दररोज जेवण, चहा-नाश्‍ता, पाणी पाठवण्यात येते. खऱ्या अर्थाने पालकत्वाचे काम ना.पाटील यांच्याकडून सुरु असल्याचे चित्र गेल्या पंधरा दिवसापासून पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT