In the guise of concessions in house tax 
कोल्हापूर

गाळा' शोधत घरफाळ्यात सवलतींची खैरात 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : अधिकाराचा गैरवापर करत संगणकामध्ये चुकीच्या नोंदी करून "गाळा' शोधत घरफाळा आकारणीत तीन कोटी 14 लाखांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणाचा तपास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुरू केला. संबंधितांवर कारवाई करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी हलचाली सुरू केल्याची चर्चाही सुरू आहे. 

घरफाळा आकारणीत 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रुपयाच्या गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, अधीक्षक नितीन नंदवाळकर, अनिरुद्ध शेटे, कनिष्ठ लिपिक विजय खातू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील गैरव्यवहाराची व्याप्ती विचारात घेऊन पोलिसांनी संबधितांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. 

प्राप्त झालेल्या माहिती आधारे ठोस पुरावे जमा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आज रविवार सुट्टी असल्याने पोलिसांना कार्यालयातील दप्तर, संगणकीय प्रणाली आदींची तपासणी करता आलेली नाही. ही तपासणी उद्या (ता. 15) केली जाणार आहे. यात ठपका ठेवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पवार व कर्मचारी सुभाष सरवडेकर तपास करीत आहेत. दरम्यान, संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा असली तरी त्याची खात्रीलायक माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT