Gundgiri in Kolhapur will be crushed 
कोल्हापूर

कोल्हापुरातील गुंडगिरी ठेचून काढणार ः पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांचे अधिकाऱ्यांना आदेश

प्रतिनिधी

कोल्हापूर ः शहरात डोके वर काढणारी गुंडगिरी वेळीच मोडून काढा. गांजासह अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा. तसेच शहरातील वाहतुकीचे नियोजन करा, असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिले. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 
कोरोना संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर काही अंशी व्यवहार सुरू झाले. त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आज शहरासह इचलकरंजीतील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले. कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी आपली काळजी घेऊन बंदोबस्ताबरोबर कर्तव्य बजावावे. शहरातील गुंडगिरी वाढत आहे. किरकोळ कारणावरून गटागटात हाणामाऱ्या होत आहेत. ही गुंडगिरी डोके वर काढण्यापूर्वीच मोडून काढा. त्यासाठी झोपडपट्टीसारख्या परिसरावर लक्ष ठेवून संबंधित गुंडांवर कारवाई करा. गांजासारख्या अमली पदार्थांसह मद्याची छुपी विक्री करणाऱ्यांना शोधून काढा. त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले. 
शहर परिसरातील वाहतूक पूर्वीसारखी सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी विशेष लक्ष द्या. सिग्नलसह गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टेंसह पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT