Gunratna Sadavarte News
Gunratna Sadavarte News 
कोल्हापूर

गुणरत्न सदावर्तेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 21 एप्रिल रोजी सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. आवश्यक कागदपत्रे न उपलब्ध झाल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात हे काम सुरू आहे. दरम्यान सरकारच्या वतीने फिर्यादी पक्षाला सहकार्य करण्यासाठी अॅड. शिवाजीराव राणे यांनी दिलेल्या अर्जास न्यायालयाने मंजुरी दिल्याचे अॅड.राणे यांनी सांगितले.

कोल्हापूर मुक्काम टाळण्यासाठी सदावर्तेंनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र आवश्यक कागदपत्रे न उपलब्ध झाल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अॅड. शिवाजीराव राणे यांनी सरकार पक्षाला मदत करण्यासाठी अर्ज सादर केला होता या अर्जाला मंजुरी मिळाली असल्याचे राणे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर अॅड. सदावर्ते यांना अटक झाली होती. मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात तक्रार दाखल झाली. सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील (कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT