Gunthewari malpractice in Karveer on the spot; Certificate of both of the same number 
कोल्हापूर

करवीर' मधील गुंठेवारीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर ; एकाच क्रमांकाचे दोघांना प्रमाणपत्र 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर :  एकाच गुंठेवारीच्या क्रमांकावर दोघांना प्रमाणपत्र देण्याचा प्रताप करवीर तहसीलमधून झाल्याची माहिती "सकाळ'च्या हाती आली. करवीर तालुक्‍यातील मोठ्या गावांत हा प्रकार घडला आहे. यावरून गुंठेवारीची प्रमाणपत्रे बनावट देण्याचे काम झाल्याचे अधोरेखित होत आहे. हा प्रकार उघडकीस येऊ नये, म्हणून अधिकृत प्रतींची मागणी केल्यास त्या उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

 
करवीर तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात गुंठेवारीची बनावट प्रमाणपत्रे देण्याचा उद्योग साखळी पद्धतीने झाला आहे. यात काही गॅझेटेट अधिकारी सहभागी आहेत काय? याची चौकशी होण्याची गरज आहे. प्रथमदर्शनी बनावट असलेल्या अनेक गुंठेवारी प्रमाणपत्रावर एकाच अधिकाऱ्यांची सही असल्याचे दिसून येते. या सहीत फरक दिसत असला तरीही ती एकाच अधिकाऱ्यांच्या कालावधीत निघाल्याची माहिती पुढे येत आहे. प्रत्यक्षात या सह्याही खऱ्या आहेत, की बनावट आहेत, याची ही चौकशी होणे अपेक्षित आहे. 

गुंठेवारी प्रमाणपत्रावरील उजव्या कोपऱ्यात क्र. गुंठेवारी ः एस. आर. असे लिहून यापुढे क्रमांक लिहिलेला असतो. अशी दोन गुंठेवारी प्रमाणपत्रे एकाच क्रमांकांची असल्याची माहिती आहे. गुंठेवारीच्या एका क्रमांकावर महिलेच्या नावे गुंठेवारी झाली आहे, तर याच क्रमांकावर दुसऱ्या कागदावर एका पुरुषाच्या नावेही गुंठेवारी प्रमाणपत्र दिले आहे. विशेष म्हणजे ही सर्व माहिती शासकीय कार्यालयातील कागदपत्रांवरून पुढे आली आहे. ही दोन्ही कागदपत्रांवर सरकार दरबारीची नोंद दिसून येते. 

प्रामाणिकपणे चौकशीची गरज 
एकाच क्रमांकाची दोन गुंठेवारी प्रमाणपत्रे कशी दिली, याची माहिती घेताना दोन्ही गुंठेवारी प्रमाणपत्रे एकाच दिवशी दिल्याचे पुढे येत आहेत. 
या दोन्ही गुंठेवारी प्रमाणपत्रांची चौकशी केल्यास दोन्हीपैकी बनावट कोणते हे पुढे येईल. गुंठेवारी प्रमाणपत्रे बनावट करणाऱ्यां टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी याची सखोल चौकशी प्रामाणिकपणे होणे आवश्‍यक आहे. 

प्रमाणपत्रावर तारीख महिना रिक्त 
महिलेच्या नावे दिलेल्या प्रमाणपत्रावर गुंठेवारी एस. आर. क्रमांक काळ्या शाहीने हस्ताक्षरात लिहिला आहे. तर पुरुषाच्या नावे दिलेल्या गुंठेवारी प्रमाणपत्रावर गुंठेवारी एस.आर.क्रमांक हा प्रिंटेड (छापील) आहे. महिलेच्या नावे असलेल्या प्रमाणपत्रावर क्रमांकाच्या खालील तारीख असलेल्या रकान्यात तारीख आणि महिना रिक्त असून साल 2015 असे लिहिले आहे तर पुरुषाच्या नावे असलेल्या प्रमाणपत्रावर प्रिंटेड (छापील) तारीख असून वर्ष 2015 आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT