injection 
कोल्हापूर

कोल्हापूर: हिमोफिलियाचे इंजेक्शन मिळणार आता सीपीआरमध्ये

हिमोफेलिया इंजेक्शन (फॅक्टर)चे लोकार्पण ; पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) मध्ये हिमोफेलिया या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शन (फॅक्टर) चा लोकार्पण सोहळा आज स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

सीपीआर, हिमोफेलिया सोसायटी, हिमोफेलिया फेडरेशन,( नवी दिल्ली) यांच्या सहकार्यातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हिमोफिलिया या अनुवंशिक आजारासाठी लागणारे फॅक्टर इंजेक्शन आता सीपीआर येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या इंजेक्शनमुळे सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, बेळगाव येथीलही रुग्णांची सोय होणार आहे.

सोहळ्यात पालकमंत्री पाटील म्हणाले,कोल्हापूर जिल्हा ही दातृत्वाची भुमी आहे. कोविड परिस्थितीत सीपीआर रुग्णालयाने उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. अशातच हिमोफिलियाच्या अनुवंशिक रुग्णांवरही उपचार करण्याचा चांगला निर्णय या रुग्णालयाने घेतला आहे. पालकमंत्री या नात्याने या रुग्णांना आरोग्य‍ विषयक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पुढे ते म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता सीपीआरमध्ये नॉन कोविडसाठी राखीव बेड ठेवण्यात यावेत. त्याचबरोबर राज्यात ज्या ठिकाणी या आजारावर उपचार करण्यात येतात अशा 10 ठिकाणची माहिती देण्यात यावी. जेणेकरुन या रुग्णांवर उपचार करणे सोईचे होईल. सध्या जिल्ह्यात या आजाराच्या 200 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असून या उपचारांच्या व रुग्णांच्या अनुषंगाने आरोग्य मंत्र्यांचीही भेट घेणार आहे.

तत्पूर्वी या आजाराच्या उपचारार्थ रुग्णांसाठी सीपीआरमध्ये 10 कायम स्वरुपी बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी डॉ गिरीराज काकडे, हिमोफेलिया सोसायटीचे अध्यक्ष रामू गडकर डॉ. वरुण बाफणा, डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. मोहन पाटील, डॉ. मोहन बर्गे यांच्यासह सीपीआर मधील सर्व डॉक्टर्स, हिमोफेलिया सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT