Hajj Pilgrims esakal
कोल्हापूर

Hajj Pilgrims : उष्माघातामुळं तब्बल 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; कोल्हापुरातील 444 हज यात्रेकरू सुखरूप

सौदी अरेबियातील मक्का (Hajj Yatra 2024) आणि मदिना येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना कडाक्याच्या उन्हाचा फटका बसलाय.

सकाळ डिजिटल टीम

ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) सौदीमध्ये पन्नास अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे.

कोल्हापूर : सौदी अरेबियातील मक्का (Hajj Yatra 2024) आणि मदिना येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना कडाक्याच्या उन्हाचा फटका बसलाय. सौदी अरेबियाच्या सरकारी टीव्हीनं सांगितलंय की, मक्कामधील मशिदीचं तापमान सोमवारी 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. त्याचवेळी, उष्णतेमुळं आतापर्यंत 35 पाकिस्तानी नागरिकांसह 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ४४४ हज यात्रेकरू (Hajj Yatra Heatstroke) सुखरूप आहेत. त्यांपैकी चौघे हरवले होते. ते पुन्हा सुखरूप त्यांच्या गटामध्ये सहभागी झाले. उष्माघाताने त्यांना त्रास होणार नाही यासाठी सौदी सरकारकडून तेथे कृत्रिम पाऊस पाडल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, सांगलीतील एका अभियंत्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. त्याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र राज्य हज समिती आणि भारत हज समितीच्या माध्यमातून घेतली जात आहे.

जिल्ह्यातील ३१९ हज यात्रेकरून राज्य आणि भारत या दोन्ही समितीच्या माध्यमातून पोहोचले आहेत. तसेच खासगी टूर कंपनीकडून १२५ हज यात्रेसाठी गेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) सौदीमध्ये पन्नास अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे. मक्का येथून सर्वजण ‘मीना’ शहरात पोहोचले आहेत. तेथील ‘आराफत’ मैदानावर त्यांची तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

‘जमरात’ येथे तीन सैतानांचे स्तंभ आहेत. त्यांना प्रत्येकी सात दगड मारण्याची प्रथा आहे. तेथे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील यात्रेकरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील चौघेजण हरवले होते; मात्र त्यांच्याकडील बॅण्डवरून त्यांना पुन्हा त्यांच्या गटात सोडले आहे. या बॅण्डमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, कोठून आली, कोठे जाणार आहे, गाव, जिल्हा, राज्य, देश, सौदीत त्यांचे राहण्याचे ठिकाण याची माहिती असते.

पत्नीने पतीच्या शोधासाठी केले प्रयत्न

भवानी मंडप येथील वडेवालेचाचा अस्लम बागवान हे दोन दिवस बेपत्ता होते. त्यांनी येथे कोल्हापुरात समीर मुजावर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी याची माहिती ग्रुपवर शेअर केली. त्यानंतर ‘चारमिनार’ येथील हॉटेलचा मॅप त्यांना देण्यात आला. त्या आधारे ते गटात सुखरूप पोहोचले. दरम्यान, त्यांच्या पत्नीने पतीच्या शोधासाठी अनेक प्रयत्न केले. अखेर आज त्यांचे पती अस्लम यांची भेट झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT