Half A KM Of Road Disappears, Uttar's Farmers Complain Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

अर्धा किमीचा रस्ता गायब झाल्याची उत्तूरच्या शेतकऱ्यांची तक्रार

अशोक तोरस्कर

उत्तूर : उत्तूर-आरदाळ पाणंद रस्त्यावर अतिक्रमण झाले असून अर्धा किमीचा रस्ता गायब झाला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आजरा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी हा रस्ता राज्यमार्ग म्हणून परिचित होता. या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने वाहतूक बंद झाली; मात्र शेतकरी हा रस्ता वापरत होते. या रस्त्याची नोंद शासन दप्तरी आहे. सध्या या रस्त्याच्या कडेला काही शेतकऱ्यांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे येथे सावंतवाडी या नावाने नवीन वसाहत तयार झाली आहे.

या परिसरात 300 शेतकरी सुमारे 3500 टन ऊस पिकवतात. गावापासून ओढ्यापर्यंत 28 फूट व त्यापलीकडे 33 फूट रुंदीचा रस्ता होता; मात्र या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. या रस्त्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मंजूर करून आणला आहे.

त्यामुळे येथील तातडीने अतिक्रमण हटवावे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, अमृतराव पाटील, एम. डी. सावंत, संभाजी कुराडे, पांडुरंग लकांबळे, मोहन लकांबळे, गणपती सावंत, श्रीपती सावंत, शंकर सावंत, व्यकंटेश मुळीक, सुधाकर सावंत, पुंडलिक पाटील, हणमंतराव पाटील, मुकुंद पाटील यांच्यासह शंभर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मॉन्सून कोकणातच खोळंबला! मुंबईवर पाणीटंचाईचे संकट, पाऊस कधी बरसणार? मोठी अपडेट समोर

India Squad: फक्त जैस्वालच नाही, 'या' तीन दिग्गजांचीही इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही; एकाची तर ODI करियर संपल्याचीच चर्चा

मुख्यमंत्र्यांना ७ पट दुषित पाणी दिलं, अधिकाऱ्याला धाडली नोटीस

Latest Marathi News Live Update : अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर RPFकडून रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा मॉक ड्रिल

Britain Politics: पंतप्रधानांवर राजीनाम्याचे सावट! १०० हून अधिक खासदारांचा दबाव; PM सोबत ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT