Halgi's crunch subsided, the tone of life lost 
कोल्हापूर

हलगीचा कडकडाट आकसला, जगण्याचा सूर हरवला 

सुधाकर काशिद

कोल्हापूर : यात्रा, जत्रा, उरूस रद्द, लग्न सोहळे लांबणीवर, सभा समारंभावर बंदी, कुस्त्याची मैदाने रद्द झाला. लॉकडाउनचा परिणाम पण याचा परिणाम हलगीच्या कडकडाटावर झाला आहे. महिन्याभरात हातच फिरला नसल्यामुळे हलगीचा ताव आकसला आहे. एरव्ही गळ्यात अडकवून कडकडणाऱ्या हलग्या खुटीवर मान टाकून अडकल्या आहेत. कोल्हापुरात हलगीच्या कडकडाटावर जगणाऱ्या आणि इतरांच्या सोहळ्यात चैतन्य आणणाऱ्या 64 कुटुंबाचीही अवस्था अशीच झाली आहे. या कुटुंबाच्या जगण्याचा सूर हरवला आहे. आतापर्यंत एकमेकाला मदतीचा हात देत त्यांचा महिना कसाबसा निघाला आहे. आता मात्र सगळेच एका रांगेत आले आहेत. 
कोल्हापूर म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक सोहळ्याची रेलचेल. आणि या सोहळ्यात हलगीचा कडकडाट ठरलेलाच. लग्नातला घुघुळ, वरात, बेंदराची मिरवणूक, जत्रा यात्रातील पालखी सोहळे, वेगवेगळ्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका, निवडणुकीच्या प्रचार फेऱ्या यात हलगी नसली तर मजाच नसते. एवढेच काय कुस्ती मैदानात रणवाद्याच्या स्वरूपात हलगी कडकडते. यामुळेच हलगी म्हणजे कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक जीवंतपणाचे प्रतीक ठरली आहे. 
कोल्हापुरात बुचडे, लोखंडे, घुले, आवळे, साठे, बनसोडे, दाबाडे, केंगार, तडाखे, आदमाने, गायकवाड, बाटे, चांदणे, सुतार, घाडगे, भोसले, सूर्यवंशी, गवळी अशा विविध 64 कुटुंबाचा उदरनिर्वाह हलगीवर चालतो. हलगी, सोबतीला घुमके, कैचाळ ही वाद्ये असा साधारण चार ते सहा जणांचा ग्रुप असतो. कार्यक्रमाची सुपारी दिली तर ठरलेल्या वेळेत सांगितलेल्या ठिकाणी हजर असतो. कागद किंवा चगाळा पेटवून त्यावर हलगी शेकली की हलगीला ताव येतो. ताव आल्यावर हलगीवर मायेचा हात फिरवला जातो आणि हलगीवर कुडापणीचा (छोटी काठी) ठेका पडतो आणि हा ठेका क्षणाक्षणाला वाढतच जातो. समोरच्याला डुलायलाच लावतो. कडकडातही एक सुंदर लय कशी असते. रोज कोठे ना कोठे एखादा कार्यक्रम, सोहळा असतोच. त्यामुळे हलगीवाल्यांना काम मिळते. त्यावर त्यांची रोजीरोटी चालते. पूर्वी हलगीवाला विजार शर्टवर असायचा आता जीन्स टी शर्टवरही असतो. म्हणजेच नव्या पिढीनेही हलगी स्वीकारली आहे. तरुण मुले आनंदाने उतरली आहेत. या बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली आहे. मात्र महिनाभरात लॉकडाउनमुळे सारे थांबले आहे. एकवेळ गुपचूप एखादा सोहळा ठीक आहे. पण हलगी वाजवून कार्यक्रम केवळ अशक्‍य आहे. त्यामुळे सर्व हलगीवाले घरी बसून आहेत. मदतीसाठी कोणापुढे हात पसरावा म्हटले तरी मन तयार होत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे आपणच या 64 जणांना पंधरा दिवस, महिनाभर पुरेल एवढा शिधा देऊ शकलो तरच हलगीला पुन्हा ताव येणार आहे. 

हलगीच्या कडकडाटावर आम्ही सणसमारंभ सोहळ्यात चैतन्य आणतो. आता आमचेच चैतन्य या लॉकडाउन परिस्थितीत हरवले आहे. बघा आमच्यासाठी काय करता येते का ?. आम्ही 64 जण आहोत. या काळात आम्हाला साथ द्या. कोरोना गेल्यावर आम्ही हलगीचा बार उडवतो. आणि सर्वांच्या तनामनात बघा कसे चैतन्य आणतो. 
- संजय आवळे, हलगीवादक  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT