This hampered the skill development of the workers in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरातील कौशल्य विकास अडला यामुळे कारणामुळे

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः कौशल्य विकास केंद्रासाठी खुद्द उद्योग मंत्र्यांनी चार वेळा ग्रीन सिग्नल देवून ही अद्यापही जागेचा प्रश्‍न कायम आहे. कागल-हातकणंगले पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील कौशल्य विकास केंद्र नियोजित आहे. सुमारे चाळीस हजारांहून अधिक कामगारांना याची गरज असतानाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) जागा देण्याबाबत कार्यवाही होत नाही.

कामगारांच्या कौशल्यात भर पडल्यास उद्योजकांना आवश्‍यक ध्येय गाठणे सोपे जाते. यासाठी कामगारांना अत्याधुनिक पद्धतीचे ज्ञान आवश्‍यक आहे. ज्या कामगारांनी आयटीआय पूर्ण केला आहे, त्यांनाही अद्ययावत यंत्राचे ज्ञान देणे गरजेचे आहे. यातूनच पंचतांरांकीत औद्योगिक वसाहतीत मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ कागल ऍण्ड हातकणंगले (मॅक)ने ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चार-पाच वर्षे हे प्रयत्न सुरू झाले आहे. याचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केले आहे. खुद्द उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी याला चार वेळा ग्रीन सिग्नल दिला. मात्र काही त्रुटी काढून प्रस्ताव परत केला. त्यातून "ट्रेनिंग सेंटर' च्या ठिकाणी "स्किल डेव्हलपमेंट सेंटर' उभारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा स्किल डेव्हलमेंटचा प्रस्ताव मंत्रालयात दिला आहे. यासाठी असोसिएशनच्या जवळील सुमारे तीस हजार चौरस फुटांच्या जागेची मागणी केली आहे. मात्र याला मंजुरी मिळत नसल्याचे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे.


मॅक असोसिएशन शेजारीच एमआयडीसीचा प्लॉट आहे. स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यासाठी त्याची मागणी शासनाकडे केली आहे. एमआयडीसीकडे प्रस्ताव दिला आहे. उद्योग मंत्र्यांकडून त्याला चार वेळा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र प्रत्यक्षात हा प्लॉट मिळालेला नाही. यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे उद्योजक नाराज आहेत. 
गोरख माळी ः अध्यक्ष मॅक

पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी "मॅक'कडून जागेची मागणी केली आहे. त्याबाबत एमआयडीसी सकारात्मक आहे. लॉकडाऊनमुळे प्रक्रीया प्रलंबित राहिली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल.  - धनंजय इंगळे ः प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT