harat Bandh agitation called by the farmers unions did not get any response in the kolhapur city 
कोल्हापूर

भारत बंदचा कोल्हापुरवर परीणाम नाही ; मात्र ग्रामीण भागात विधेयकाची होळी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : सुधारित शेतकरी विधेयकाच्या विरोधात आज 260 विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला शहरात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ग्रामीण भागात काही प्रमाणात विधेयकाची होळी करण्यात आली. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला. त्यांनी विधेयकाची होळी करताना भारतीय जनता पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

सुधारीत शेतकरी व विधेयेकाच्या विरोधात आज संपूर्ण भारतात 260 विविध शेतकरी संघटनांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केले होते. त्याला शहरात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधेयकाची होळी करून आंदोलन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. देशातील विविध शेतकरी संघटना, डावी आघाडी, कामगार संघटनांनी बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र या बंदचा शहरात काहीच परिणाम झाला नाही. कोल्हापूर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होते. बिंदू चौकातील आंदोलना व्यतिरिक्त त्याचा फारसा परिणाम शहरात दिसून आला नाही. मात्र शिरोळमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधेयकाची होळी करून भाजपावर नाराजी व्यक्त केली. या आंदोलनामुळे ग्रामीण भागात याचा काहीसा परिणाम दिसून आला. 


शेतकरी हिताच्या विरोधात केलेले नवे कायदे तसेच शेतकी अध्यादेश रद्द करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या विविध संघटनांतर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे..शेतकऱ्यांच्या शेतीमाल योग्य भाव मिळत नाही. बाजारपेठेत व्यापारी कंपन्या नाममात्र दरात शेतीमालांची खरेदी करतात, ज्यादा भावात ग्राहकाला विकून नफा कमवतात अशात शेतकऱ्यांचे नुकसान होते अस असताना केंद्र सरकारने नवीन कायदे केले यात यात शेतीमालाची सरकारी खरेदी बंद होणार आहे. यासाठी  भारत बंद आंदोलन पुपातण्यात आले .मात्र  शहरात प्रतिसाद मिळाला नाही. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT