hasan mushrif answered on the deliverance of chandrakant patil in kolhapur 
कोल्हापूर

'चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जावे लागणार नाही'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांतदादांनी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा जागा संदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भा. ज. प. चा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे दादांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भा.ज.प. पक्षही परवानगी कशी देईल ? दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे दादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.

मी दादांचे मनापासून आभार मानतो, कारण सन्माननीय राज्यपाल व सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधील चर्चेबाबत वारणेवर दादा यांनी जे वक्तव्य केले होते. त्याचा स्पष्ट इन्कार त्यांनी केलेला नाही. दुपारी १२ वा. माझी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पुण्यामध्ये दादांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, राज्यपालांना संविधानातील अधिकार आहेत ते तसे करू शकतात. म्हणजे, त्यांच्या त्या वक्तव्याची त्यांनी पुष्टीच केली.

तसेच संध्याकाळी पण त्यांनी मुश्रीफांचे विधान हास्यास्पद आहे, असे दादांनी वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांनी असे विधान आपण स्वतः केलेले नाही, मुश्रीफ खोटे बोलत आहेत किंवा त्या भागातील जागृत देवस्थान जोतिबाची शपथ घेतो, असे काहीही म्हटलेले नाही. दादांचा तो स्वभावही नाही. एकूणच काय; तर माझ्या वक्तव्याला चंद्रकांत दादांनी पुष्टी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT