hasan mushrif back on mahadevrao mahadik statement 
कोल्हापूर

मुश्रीफांच्या माघारीमागे ‘हे’आहे गणित

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - व्यक्तिगत आरोप करणाऱ्यांविरोधात थेट अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणाऱ्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतरच्या माघारीमागे जिल्हा बॅंकेचे गणित आहे. झालेली चूक दुरुस्त करत माफीनामा जाहीर करणाऱ्या श्री. महाडिक यांनाही ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मुश्रीफ यांची ‘संभाव्य’ साथ हवी आहे. त्यातूनच दोघांतील वादावर कालच पडदा पडल्याचे बोलले जाते.

श्री. मुश्रीफ यांनी अतिशय संघर्षातून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. तेथे काटामारी होत असल्याचा आरोप महाडिक यांनी काल राजाराम कारखान्यात भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळासमोर केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. यावर मुश्रीफ टोकाचे प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा असतानाच महाडिक यांनी त्याचे गांभीर्य ओळखून तातडीने माफीनामा तर जाहीर केलाच; पण श्री. मुश्रीफ यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगितले. त्यातून सध्या तरी या वादावर पडदा पडला असला तरी यामागे ‘केडीसीसी’, ‘गोकुळ’चे राजकारण आहे.

मुश्रीफ यांचा आजपर्यंतचा इतिहास पाहता ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले, त्यांच्यावर थेट अब्रूनुकसानीचा दावा त्यांनी केला आहे. त्यातून त्यांचे गुरू दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक हेही सुटलेले नाहीत. माजी आमदार संजय घाटगे, राजेश क्षीरसागर यांच्यावरही त्यांनी दावा दाखल केला आहे. यापैकी मंडलिक यांच्या निधनानंतर हा दावाच निकाली निघाला, तर श्री. क्षीरसागर यांच्या दिलगिरीनंतर दावा मागे घेतला गेला. त्यामुळे महाडिक यांच्या आरोपानंतरही ते टोकाची भूमिका घेतील, असे वाटत असतानाच त्यांनी शांत राहणे पसंत केले आहे.
दोन महत्त्वाच्या संस्थांच्या या निवडणुकीत काय होईल, ते होईल; पण सध्या तरी एकमेकाला सावरून घेण्याच्या महाडिक-मुश्रीफ यांच्या राजकारणामुळे जिल्ह्यात नव्या राजकारणाची नांदी ठरण्याची शक्‍यता आहे.

एकमेकांची राजकीय सोय
मुश्रीफ यांच्यादृष्टीने जिल्हा बॅंकेची सत्ता महत्त्वाची आहे. बॅंक बिनविरोध करण्यासाठी महाडिक यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांची साथ हवी आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकीकडे ‘गोकुळ’वरून श्री. महाडिक यांना ‘टार्गेट’ केले असताना पी.एन.-महाडिक यांना या वादात मुश्रीफ यांची साथ हवी आहे. पालकमंत्री पदावरून कितीही खुलासा झाला असला तरी मुश्रीफ-सतेज यांच्यात सुप्त संघर्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांचे दुखावलेले मन दुरुस्त करण्याचा प्रयत्न महाडिक यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

SCROLL FOR NEXT