Guardian Minister Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

छापा टाकायचाच असेल, तर तो KP पाटलांच्या घरावर टाका, साखर कारखान्यावर कशाला? मुश्रीफांचा सरकारला घरचा आहेर

‘बिद्री’ साखर कारखान्यावर (Bidri Sugar Factory) उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई चुकीची आहे.

सकाळ डिजिटल टीम

''के. पी. यांनी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार केला आहे. असे असताना त्यांनी थेट खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे स्वागत करणे अयोग्य आहे.''

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्यावर (Bidri Sugar Factory) उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई चुकीची असून, याचा मी निषेध करत आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील हे महाविकास आघाडीकडे जात आहेत म्हणून अशी कारवाई अयोग्य आहे. छापा टाकायचाच असेल, तर तो थेट के. पी. पाटील (K. P. Patil) यांच्या घरावर टाकावा, ६५ हजार सभासद असलेल्या साखर कारखान्यावर कशाला? अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारला येथे घरचा आहेर दिला. तसेच याबाबत वरिष्ठ नेत्यांशी व संबंधित मंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘या कारवाईमुळे के. पी. यांना जास्त सहानुभूती मिळणार आहे. के. पी. यांनी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार केला आहे. असे असताना त्यांनी थेट खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे स्वागत करणे अयोग्य आहे. याबद्दल त्यांना कठोर शब्दात बोललो आहे. त्यांनी थोडे थांबायला हवे होते. उत्पादन शुल्क विभागाने ज्या पद्धतीने कारवाई केली, तिथे संशयाला जागा आहे, असे पालकमंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘वीज प्रीपेड मीटर व शेतीचे प्रीपेड मीटर यासंदर्भात जनभावना लक्षात घेऊन सरकार निर्णय घेईल. शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमी संपादन थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व समाजांना आरक्षण मिळावे, ही महायुतीतील तिन्ही पक्षांची भूमिका आहे.’

‘हद्दवाढ’ निर्णय विधानसभेपूर्वी होण्याबाबत साशंकता

कोल्हापूर शहरालगतच्या सहा गावांना घेऊन सुरुवातीच्या टप्प्यात हद्दवाढ करण्याचा प्रयत्न होता; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा विषय थांबला. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वी हा प्रश्‍न कितपत मार्गी लागेल, याबाबत साशंकता असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT