hasan mushrif comment on bjp and samarjit ghatge 
कोल्हापूर

आता शेतकरी रक्ताने पत्र लिहिणार नाही, त्यामुळे कोणी राजकीय स्टंट करू नये...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - 'फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा दोन महिन्यांतच शेतकऱ्यांना लाभ होऊ लागला आहे.' असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला,ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, 'मी पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात २ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहे. त्यांना अनुदान मिळावे ही अपेक्षा आहे. मात्र, हा शेतकरी स्वाभिमानी आहे. तो शासनाला कर्जमाफीबाबत रक्ताने पत्र लिहिणार नाही. त्यामुळे याबाबत कोणी राजकीय स्टंट करून शेतकऱ्यांचा अपमान करू नये,' असा टोला त्यांनी भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांना लगावला.

सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकर्‍यांच्याच पत्राद्वारे थेट राज्यपालांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न समरजितसिंह घाटगे यांनी नुकताच केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हाताने लिहिलेली पत्रे राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. यातील तीन शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT