Parambir Singh  Parambir Singh
कोल्हापूर

"परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी करणे केंद्र सरकारला मान्य नसावं"

मला शंका होती मी सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके ठेवली होती. ती स्फोटके ठेवणारा कोण? कशासाठी ठेवली, त्याचा उद्देश काय होता ? वास्तविक हा तपास करण्याची आवश्यकता होती

अर्चना बनगे

कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्याच बरोबर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख मुंबईचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला (एनआयए) यांची तडकाफडकी बदली करून त्या ठिकाणी वर्मा नावाचे अधिकारी याठिकाणी रुजू झाले या घटनेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी आपल्या सोशल अकाउंट वरून आपले मत व्यक्त केले आहे. काय म्हणाले हसन मुश्रीफ जाणून घेऊया.

हसन मुश्रीफ म्हणाले, मला शंका होती मी सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके ठेवली होती. ती स्फोटके ठेवणारा कोण? कशासाठी ठेवली, त्याचा उद्देश काय होता ? वास्तविक हा तपास करण्याची आवश्यकता होती .परमबीर सिंग यांनी ज्यावेळी पत्र लिहिले होते. त्यावेळी मी म्हणालो होतो की, हे या गटामध्ये सामील आहेत आणि ते माफीचा साक्षीदार होऊ इच्छितात. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असे त्यावेळी असंही त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले,आज माझी खात्री झालेली आहे. अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केले असावे आणि केंद्र सरकारला ते मान्य नसावं. परमवीर सिंग वाजे प्रकरणात सहभागी असावेत याचा तपास अजून का होत नाही व त्यांची रवानगी कोठडीत झाली तरी देखील त्यांची चौकशी झाली नाही इतका मोठा तपास सुरू असताना बदली मग कशासाठी काहीतरी नक्कीच शिजत असून याची चौकशी झाली पाहिजे अशी शंका उपस्थित करून हसन मुश्रीफ आणि मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT